लोकप्रतिनिधींनी घेतला सांस्कृतिक भवनच्या कामाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 08:10 PM2017-10-13T20:10:28+5:302017-10-13T20:53:13+5:30
क्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत स्थानिक रामदासपेठ येथे क्रीडा संकुलच्या जागेवर सर्वांग सुंदर व सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे. याठिकाणी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधिर सावरकर यांनी भेट दिली
अकोला: क्रीडा संकुल समितीच्या अंतर्गत स्थानिक रामदासपेठ येथे क्रीडा संकुलच्या जागेवर सर्वांग सुंदर व सुसज्ज असे सांस्कृतिक भवन उभारण्यात येत आहे. याठिकाणी खासदार संजय धोत्रे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय , आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधिर सावरकर यांनी भेट दिली
व कामाची पाहणी केली. तसेच सांस्कृतिक भवनाच्या बांधकामाचे कंत्राटदार सारंग पाटील यांचेकडून सांस्कृतिक भवनाच्या कामाच्या प्रगती जाणून घेवून प्रगतीचा आढावा घेतला. संबंधीत कंत्राटदारांना सांस्कृतिक भवनाचे काम दर्जेदार व मानकानुसार पुर्ण करावे अशा सुचना दिल्यात. सदर काम वेळेत पुर्ण करण्याचे निर्देश यावेळी कंत्राटदारांना देण्यात आले.
जिल्हयातील कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांना व्यासापिठ मिळावे यासाठी शासनातर्फे भव्य असे सांस्कृतिक भवन निर्माण करण्यात येत आहे. त्यांचे बांधकाम ७0 टक्के पुर्ण झाले असून, येत्या मार्च २0१८ पयर्ंत सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पुर्ण होईल. त्यानंतर इंटेरियर डेकोरेशनचे
काम सुरू करण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली.
यावेळी अखिल भारतीय नाटय संम्मेलनाचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नाटयकर्मी राम जाधव , अशोक ढेरे, गजानन नारे, गजानन धोंगडे, शाहीर मानवटकर तसेच मनपाच्या स्थायी समितीचे सभापती बाळ टाले, नगरसेवक राहुल देशमुख, क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी , भाजपाचे महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटीलयांची प्रमुख उपस्थिती होती.
14सीटीसीएल