तेल्हारा येथे खेडकर महाविद्यालयात क्रांतीदिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:42+5:302021-08-12T04:23:42+5:30
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात ...
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोपाल ढोले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ. धीरज नजान यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोपाल ढोले यांनी अध्यक्षीय समारोप करताना १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाचा परामर्ष घेत सविस्तर मार्गदशन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. स्वप्नील फोकमारे यांनी केले, तर आभार प्रा. दीपिका ताथोड यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक रमेश लोणकर, प्रा. सुषमा फरसोले, डॉ. कृष्णा माहुरे, डॉ. गोपाल जोंधळेकर, डॉ. रजनी बोबडे, प्रा. अक्षय पाथ्रीकर, प्रा. भुईभार इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल गेबड, मंगेश देवतळे, हिंमत फोकमारे, शैलेश फोकमारे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतला होता.