चांगल्यासाठी बक्षीस अन् चुकीला शासन - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 02:19 AM2017-12-04T02:19:21+5:302017-12-04T02:23:06+5:30
चांगले काम केले, तर बक्षीस अन् चुकीचे काम केले तर शासन आहे. या भाषेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्यांशी संवाद साधला. अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांकडून खड्डेमुक्त अभियानात विकास कामांचा त्यांनी आढावा घे तला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्वत:चे घर बांधताना, जशी कौटुंबिक काळजी आपण घेतो. त्याच्या चांगल्या-वाईटची जबाबदारी आपण स्वीकारतो, त्याच पद्धतीने काळजी सार्वजनिक बांधकाम विभागातील मार्ग, इमारती आणि ब्रीज बांधताना घ्या. व्यक्तिगत, कौटुंबिक आणि सामाजिक जाणीव ओळखून काम करा. चांगले काम केले, तर बक्षीस अन् चुकीचे काम केले तर शासन आहे. या भाषेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकार्यांशी संवाद साधला. अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम अधिकार्यांकडून खड्डेमुक्त अभियानात विकास कामांचा त्यांनी आढावा घे तला.
रविवारी सायंकाळी पाच ते सात वाजेपर्यंत त्यांनी वेगवेगळ्य़ा मुद्यावर संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या सभेच्या मंचावर पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, महा पौर विजय अग्रवाल, खा. संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, प्रकाश भारसाकळे, आकाश फुंडकर, अकोला मंडळाचे कार्यकारी अभियंता गिरीश जोशी, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तसेच उ पजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंडळातील अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील कामांचा पावर पाइंट प्रेझण्टेशनद्वारे आढावा घेतला. रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी खड्डेमुक्त अभियानात काय केले, याची माहिती त्यांनी प्रत्यक्ष संवादातून घेतली.
तिन्ही जिल्ह्यातील स्ट्रक्चर ऑडिटचा गोषवारा येथे दिला गेला. पूर्वीच्या निविदा आणि आता निविदा प्रक्रियेत बदल केल्याने १४00 ऐवजी केवळ ४२ निविदा काढाव्या लागल्याची जमेची बाजूही पाटील यांनी येथे व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभागात निर्माण होणार्या कोर्ट केसेस सांभाळण्यासाठी लॉ ऑफीसर किंवा जनसंपर्क अधिकार्यांची आवश्यकता असल्याची मागणी येथे अभियंत्यांकडून झाली. कार्यकारी अभियंत्यांची वेळ या कामात व्यर्थ होत असल्याचे सांगितले गेले. अकोल्यातील विकास कामांमध्ये न्यायालयीन इमार त, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील व्याख्यानगृह, मुलांचे-मुलींचे वस ितगृह, जिल्ह्यातील विविध रस्त्यांचे बांधकाम दाखविले गेलेत.
गांधीग्राम येथील नव्याने बांधलेला अद्ययावत पूल लवकरच सर्मपित होणार असल्याची माहितीही येथे दिली गेली. डाबकी रेल्वे पूलचे बांधकाम युद्ध स् तरावर सुरू असल्याची माहितीही येथे दिली गेली. इतर जिल्ह्यातील मार्ग आणि राज्य महामार्गांचे बांधकाम सुरू असल्याचेही येथे सांगितले गेले.
अकोला-अकोट, अकोट-अंजनगाव सुर्जी आणि अंजनगाव सुर्जी- मध्य प्रदेश जोडणार्या राज्य महामार्गाचे काम तीन टप्प्यात असून, त्या कामाला १५ दिवसांत गती मिळेल, असेही येथे सांगितले गेले. सरतेशेवटी राष्ट्रीय महामार्ग अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता आर.बी. झाल्टे यांनी थोडक्यात त्यांच्या विभागाची माहिती दिली. सभेचे संचालन मंडळाचे अधीक्षक अभियंता गिरीश जोशी यांनी, तर आभार विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौव्हान यांनी केले.
लवकरच मेगा भरती
मनुष्यबळाची कमतरता हा विषय संपूर्ण राज्याचा आहे. लवकरच सार्वजनिक बांधकाम विभागात मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. त्यातून सर्व विभागातील प्रश्न सुटतील, असेही चंद्रकात पाटील यांनी सांगितले.