दंगलीतील आरोपींना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:20 AM2021-05-26T04:20:00+5:302021-05-26T04:20:00+5:30

कापूस व्यापाऱ्यांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. वसीमुद्दीन उर्फ ​​गुड्डू राज याने अमरावती येथील त्याच्या साथीदारांना बोलाविले. देशी कट्टा घेऊन ...

Riot accused remanded in police custody till May 28 | दंगलीतील आरोपींना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी

दंगलीतील आरोपींना २८ मेपर्यंत पोलीस कोठडी

Next

कापूस व्यापाऱ्यांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला. वसीमुद्दीन उर्फ ​​गुड्डू राज याने अमरावती येथील त्याच्या साथीदारांना बोलाविले. देशी कट्टा घेऊन दोन वाहनांतून आरोपी येथील हालुपुराला पोहोचले आणि त्यांनी देशी कट्ट्यातून गोळीबार केला. यात सुलताना परवीन (रा. गायगाव) ही गंभीर जखमी झाली. तसेच मोहम्मद साकीब ए. गफ्फर याच्यावर चाकूने वार करून जखमी केले. दोघाही जखमींवर सर्वोचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी यामध्ये मोहम्मद खिझार, सैफ अली, वसीमुद्दीन उर्फ ​​गुड्डू राज, झिशान अहमद, शेख अल्बक्ष, शहजाद खान, सा. वसीम, ए. हक, शाहबाज अहमद यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३२४, ३२६, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १८८ सह धारा ३/२५, ४/२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच दुसऱ्या गटातील अज्ञात लोकांविरुद्ध वसीमोदीन उर्फ गुड्डू राज याच्या तक्रारीनुसार भादंवि कलम ३२४, १४३, १४४, १४७, १४८, १४९, १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Riot accused remanded in police custody till May 28

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.