वाढत्या महागाईने सर्वसामान्य हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:22 AM2021-08-22T04:22:35+5:302021-08-22T04:22:35+5:30

---------------------- ३३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ ; मात्र लाखपुरी सर्कल वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी लाखपुरी : प्रधानमंत्री पीक ...

Rising inflation is a common nuisance | वाढत्या महागाईने सर्वसामान्य हैराण

वाढत्या महागाईने सर्वसामान्य हैराण

Next

----------------------

३३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना लाभ ; मात्र लाखपुरी सर्कल वंचित

शेतकऱ्यांना लाभ देण्याची मागणी

लाखपुरी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा काढलेल्या शेतकऱ्यांपैकी अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के मर्यादेपेक्षा नुकसान भरपाई आगाऊ रक्कम देण्याबाबत जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी बुधवार, दि. ११ ऑगस्ट रोजी आदेश निर्गमित केले होते. यामध्ये लाखपुरी सर्कल नाव नसल्याने सर्व लाखपुरी सर्कल मधील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लाखपुरी मंडळाचा समावेश करण्याची मागणी होत आहे.

मागील महिन्यात लाखपुरी सह परिसरातील अनेक गावांमध्ये दि. २१, २२ ,२३ रोजी अतिवृष्टी, ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. अनेक गावांमध्ये व पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. परिसरातील लाखपुरी, दुर्गवाडा, सांगवी, मंगरुळ कांबे, रसूलपूर, खुदावंतपूर, रेपाटखेड, दातवी, लाईत, जांभा, वाघझळी, भटोरी, विरवाळा, घुगशी, मुगशी, सांगवामेळ, दताळा, जांबा बु, शेलु , पारद आदी गावांना फटका बसला आहे. त्यानंतरही लाखपुरी सर्कलला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लाखपुरी मंडळाचा समावेश करावा, अशी मागणी होत आहे.

----------------------

जिल्हा प्रशासनाकडून ३३ महसूल मंडळांना नुकसानभरपाई मिळणार अशी माहिती दि. ११ ऑगस्ट रोजी निर्गमित केली, तर लाखपुरी सर्कल मधील पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना भरपाईची आगाऊ रक्कम देण्यात यावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.

-मीनल नवघरे, मा. पं. स. सदस्य, लाखपुरी.

-----------------------

लाखपुरी सर्कलमधील सर्व शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई रकमेच्या २५ टक्के मर्यादेपेक्षा नुकसान भरपाई आगाऊ रक्कम द्यावी, इतर मदत सुद्धा द्यावी, जेणे करुन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

-अरुण वानखडे, शेतकरी, लाखपुरी.

Web Title: Rising inflation is a common nuisance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.