वाढती लोकसंख्या विकासाला घातक - संजय तुपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:44+5:302021-07-22T04:13:44+5:30
अकोला: प्रत्येक देशाला भेडसावणाऱ्या समस्येमध्ये वाढणारी लोकसंख्या विकासाला घातक असून वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे मूलभूत सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश येत असल्याचे ...
अकोला: प्रत्येक देशाला भेडसावणाऱ्या समस्येमध्ये वाढणारी लोकसंख्या विकासाला घातक असून वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे मूलभूत सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश येत असल्याचे मत बँकिंग अँड फायनान्स गोखले एज्युकेशन, सोसायटी बिटको कॉलेज नाशिकचे प्राचार्य व अर्थशास्त्राचे अभ्यासक डॉ. संजय तुपे यांनी २१ जुलै राेजी व्यक्त केले.
श्री शिवाजी महाविद्यालयात स्व. डॅडी देशमुख पुण्यस्मरण व जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयाेजित एकदिवसीय आभासी व्याख्यानात प्रमुख वक्ते म्हणून ते बाेलत हाेते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य व अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. रामेश्वर भिसे यांनी माल्थस यांच्या लोकसंख्या सिद्धांताची प्रासंगिकता समजावून सांगितली. स्व. डॅडी देशमुख यांच्या कार्याला त्यांनी उजाळा दिला. प्रास्ताविक डॉ. उमेश घोडेस्वार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्राजक्ता पोहरे यांनी केले. कार्यक्रमाला विनोद देशमुख, प्रा. चव्हाण, प्रा. रुपाली काळे, प्रा. मयुरी गुढधे, प्रा. अनिता दुबे, प्रा. मुने, महादेव मेहेंगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक व अभ्यासक यांची ऑनलाइन उपस्थिती होती. संगणक व अर्थशास्त्र विभागाचे सहकार्य लाभले.