‘स्टेरॉईड’च्या अनियंत्रित वापरामुळे लंग्स फायब्रोसिस अन् म्युकरमायकोसिसचा धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:41+5:302021-07-22T04:13:41+5:30

अकोला : कोविडच्या गंभीर रुग्णांवर ‘स्टेरॉईड’चा वापर केल्या जातो. त्यामुळे अनेकांचे प्राणदेखील वाचले आहेत, मात्र स्टेरॉईडचा अतिवापर झाल्यास म्युकरमायकोसिसचा, ...

Risk of lung fibrosis and mucorrhoea due to uncontrolled use of steroids! | ‘स्टेरॉईड’च्या अनियंत्रित वापरामुळे लंग्स फायब्रोसिस अन् म्युकरमायकोसिसचा धोका!

‘स्टेरॉईड’च्या अनियंत्रित वापरामुळे लंग्स फायब्रोसिस अन् म्युकरमायकोसिसचा धोका!

Next

अकोला : कोविडच्या गंभीर रुग्णांवर ‘स्टेरॉईड’चा वापर केल्या जातो. त्यामुळे अनेकांचे प्राणदेखील वाचले आहेत, मात्र स्टेरॉईडचा अतिवापर झाल्यास म्युकरमायकोसिसचा, तर गरजेच्या तुलनेत कमी वापर किंवा त्याचा वापरच न झाल्यास लंग्स फायब्रोसिसचा धोका उद्भवू शकतो. पोस्ट कोविडच्या रुग्णांमध्ये हे दोन्ही प्रकार आढळून आले आहेत, त्यामुळे स्टेरॉईडचा संतुलित वापरच रुग्णांसाठी जीवनरक्षक ठरू शकतो, अन्यथा कोविडच्या रुग्णांना लंग्स फायब्रोसिस किंवा म्युकरमायकोसिससारख्या आजार होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतरही पोस्ट कोविडचा धोका कायम आहे. आतापर्यंत सुमारे १९५ पोस्ट कोविड रुग्णांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यामध्ये २८ जणांना लंग्स फायब्रोसिस असल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यतिरिक्त शंभरपेक्षा जास्त रुग्णांना म्युकरमायकोसिसला सामोरे जावे लागले. तज्ज्ञांच्या मते, कोविडच्या गंभीर रुग्णांवर ओषधोपचारादरम्यान स्टेरॉईडचा अनियंत्रित वापर झाल्याने या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे स्टेरॉईडचा वापर करताना आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, मात्र अनेकांच्या बाबतीत तसे झाले नसल्याचीही माहिती आहे. उपचारादरम्यान गरज नसतानाही रुग्णावर स्टेरॉईडचा वापर झाल्यास रुग्णाला म्युकरमायकोसिससह इतर समस्या, तर गरज असूनही स्टेरॉईडचा कमी प्रमाणात किंवा वापरच न झाल्यास रुग्णांना लंग्स फायब्रोसिसची समस्या उद्भवल्याची माहिती आहे.

स्टेरॉईडच्या वापरासंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक

स्टिरॉईडचा वापर विविध आजारांच्या उपचारात केला जातो.

त्याचा नियंत्रित वापर न झाल्यास रुग्णाला विविध समस्या उद्भवू शकतात.

आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच स्टेरॉईडचे प्रमाण असणे गरजेचे आहे.

कोविड काळात मात्र काही रुग्णालयांकडून हे प्रमाण पाळण्यात आले नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

संभाव्य धोके लक्षात घेता स्टेरॉईडच्या वापरासंदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हे आहेत धोके

लंग्स फायब्रोसिस किंवा फुप्फुस कायमचे निकामी पडू शकते.

स्टेरॉईड खूप दिवस वापरल्यास हाडे ठिसूळ होण्याचा धोका.

मोतीबिंदू, मधुमेहाचा धोका.

रोग प्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका.

पोस्ट कोविडची स्थिती

ओपीडी - १९५ रुग्ण

पुरुष - ११४ रुग्ण

महिला - ८१ रुग्ण

फायब्रोसिस - २८ रुग्ण

ज्यांचे ऑक्सिजन कमी असते त्यांनाच स्टेरॉईडची गरज असते. स्टेरॉईड हे जीवनरक्षक ठरते, मात्र त्याचा योग्य प्रमाणात वापर आवश्यक आहे. ज्यांचा सीटी स्कोअर नसेल किंवा कमी असेल, अशांना स्टेरॉईडची गरज नाही. स्टेरॉईडचा अनियंत्रित वापर झाल्यास लंग्स फायब्रोसिस, म्युकरमायकोसिससह इतरही समस्या उद्भवू शकतात.

- डॉ. सागर थोटे, छाती रोग व फुप्फुस रोग तज्ज्ञ, अकोला

Web Title: Risk of lung fibrosis and mucorrhoea due to uncontrolled use of steroids!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.