उमरा येथील आरओ प्लांट तीन महिन्यांपासून बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:31+5:302021-04-09T04:19:31+5:30
ग्रामपंचायतीकडून आरओ प्लांट बसविण्यात आले. परंतु आरओ प्लांटचे काम चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य ...
ग्रामपंचायतीकडून आरओ प्लांट बसविण्यात आले. परंतु आरओ प्लांटचे काम चुकीच्या पद्धतीने व निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य प्रभुदास खवले यांनी पंचायत समिती बिडीओंकडे केली होती. चौकशी अधिकारी घुगे यांनी चौकशी करून आरओ प्लांट काम झाले की नाही. याबाबत शंका असल्याचा अहवाल अकोट पंचायत समिती बिडीओ यांना दिला होता. त्यानंतर आरओ प्लांट तीन महिन्यात ग्रामपंचायत प्रशासकाने या कामाची एमबी तयार करून संपूर्ण बिल काढले. आज रोजी प्लांटचे अपूर्ण काम असून सुद्धा काम पूर्ण झाल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. उमरा गावाला शुद्ध पाणी पुरविण्यासाठी उभारलेला आरओ प्लांट कधी सुरू होईल. असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसेवक उईके गावात नियमित येत नसल्याच्या तक्रारी अनेकदा करून त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यात येत नाही.
फोटो:
गावातील आरओ प्लांटचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. तीन महिन्यांपासून आरओ प्लांट बंद आहे. याबाबत तक्रार करण्यात आली आहे. परंतु ग्रामसेवकावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
-गणेश नाठे ग्रामपंचायत सदस्य