दुर्गम भागातील ६५५ शाळांमध्ये आरओ वॉटर प्युरिफायर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:04 AM2019-11-17T11:04:34+5:302019-11-17T11:04:40+5:30
उर्वरित १00 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष निधीसाठी शासनाकडे शिफारस सादर करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. रणजित पाटील यांनी विकास निधीतून जिल्ह्यातील ९४५ शाळांपैकी ६५५ शाळांमधील क्लासरूम डिजिटल केल्या असून, या शाळांमध्ये आरओ वॉटर प्युरिफायरसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. आता सर्वच शासकीय शाळा डिजिटल करण्यासाठी आमदार डॉ. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. शाळा डिजिटल आणि आरओ वॉटर प्युरिफायर उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने त्यांचा शुक्रवारी सत्कार केला.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे आणि त्यांना स्वच्छ पाणी प्यायला मिळावे. तसेच सर्वच शासकीय शाळा डिजिटल व्हाव्यात, यासाठी आमदार डॉ. रणजित पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्यामुळे या निधीतून प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील शाळांसह एकूण ९४५ शाळांपैकी ६५५ शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम आणि आरओ वॉटर प्युरिफायर उपलब्ध झाले आहे. आता उर्वरित १00 शाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष निधीसाठी शासनाकडे शिफारस सादर करण्यात आली आहे. राहिलेल्या सर्व शाळांना त्यांच्या स्थानिक विकास निधीतून साहित्य देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल होणार आहेत. या कार्यासाठी आमदार डॉ. रणजित पाटील यांचा शुक्रवारी राज्य शिक्षक परिषदेचे प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चतरकर, कार्यवाह सचिन काठोळे यांनी सत्कार केला. यावेळी विश्वास पोहरे, मुरलीधर कुलट, कमलसिंग राठोड, अरुण वाघमारे, रामभाऊ मालोकार, सुनील माणिकराव, गजानन काळे, किशोर चतरकर, श्याम कुलट, नितीन बंडावार, मोहम्मद वसिमोद्दीन, दिनेश भटकर, देवेंद्र वाकचवरे, चंद्रशेखर पेठे, संतोष वाघमारे, रवींद्र आवारे, विजय धनाडे, संतोष इंगळे, मोहसीन खान, अनिल भाकरे, संदीप मानकर, विजय वाकोडे, धर्मेंद्र चव्हाण, विष्णू झामरे, गजानन शेवलकर, मनोज वाडकर, गजानन गोतरकर, सुभाष ढोकणे, वंदना बोर्डे व अंजली मानकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)