निर्माणधीन पुलानजीक रस्त्याची दुरवस्था!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:17 AM2021-04-13T04:17:32+5:302021-04-13T04:17:32+5:30
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस बु.-दिग्रस खुर्द या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या निर्माणाधीन पुलानजीक रस्त्यावर ...
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील दिग्रस बु.-दिग्रस खुर्द या रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या निर्माणाधीन पुलानजीक रस्त्यावर गिट्टी पडलेली असल्याने अपघाताच्या घटनेत वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपूर्वी दुचाकी घसरून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या पुलानजीक रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांकडून होत आहे.
दिग्रस बु.-दिग्रस खुर्दपर्यंत जवळपास अडीच किलोमीटर रस्त्याचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. तसेच या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी पुलाचे काम सुरू आहे. निर्माणाधीन पुलानजीक गिट्टी पसरलेली असल्याने या गिट्टीवरून वाहने घसरून अपघात होण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपूर्वी दिग्रस खुर्द गावात येणाऱ्या प्रवाशांचे वाहन घसरून दोघे जखमी झाल्याची घटना घडली होती. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (फोटो)
------------------------------------------
दिग्रस बु.-दिग्रस खुर्द रस्त्याचे काम संथगतीने सूरु असून, निर्माणधीन पुलाजवळ गीट्टी पसरलेली आहे. तसेच रस्त्याची दुरुवस्था झाल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहे. याकडे लक्ष देऊन रस्त्याचे काम त्वरित करावे, अन्यथा वरिष्ठांकडे तक्रार करण्यात येईल.
-मंगेश इंगळे, ग्रा. पं. सदस्य, दिग्रस खुर्द.