अवैध वाहतुकीमुळे रस्ता जाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:15 AM2021-04-03T04:15:44+5:302021-04-03T04:15:44+5:30
बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा अकाेला: शहरात निर्माणाधिन उड्डाणपुलाच्या कामामुळे मध्यवर्ती बसस्थानकात जाणाऱ्या एसटी चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा
अकाेला: शहरात निर्माणाधिन उड्डाणपुलाच्या कामामुळे मध्यवर्ती बसस्थानकात जाणाऱ्या एसटी चालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काेराेनामुळे प्रवाशांनी एसटी कडे पाठ फिरवल्याचे चित्र असून अशास्थितीत बसस्थानक परिसराला अवैध वाहनधारकांनी विळखा घातल्याची बिकट परिस्थिती आहे. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अशा वाहनधारकांचा सुळसुळाट पहावयास मिळताे.
रस्त्यालगत खाेदला खड्डा!
अकाेला: मुख्य पाेस्ट ऑफीसच्या बाजूला डाॅ.सिंगी हाॅस्पिटल आहे. त्याबाजूला असलेल्या रस्त्यालगत भलामाेठा खड्डा खाेदण्यात आला आहे. हा खड्डा बुजविण्यात न आल्यामुळे याठिकाणी काेणत्याही क्षणी अपघाताची शक्यता बळावली आहे. या रस्त्यावरून वाहनांची माेठी रेलचेल राहते. मनपा प्रशासनाने त्वरित हा खड्डा बुजविण्याची मागणी हाेत आहे.
‘लसीकरणाच्या ठिकाणी सुविधा द्या !’
अकाेला: काेराेना विषाणूचा सामना करण्यासाठी शहरात महापालिकेच्यावतीने लसीकरण केंद्र उघडण्यात आले आहेत. १ एप्रिल पासून ४५ वर्षांवरील सर्वच नागरिकांना लस घेता येणार आहे. दरम्यान, लसीकरणाच्या ठिकाणी बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यासाेबतच उन्हापासून संरक्षण व पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.
सुट्यांमुळे मनपात शुकशुकाट
अकाेला: सलग तीन दिवस शासकीय सुटी असल्यामुळे महापालिकेत शुक्रवारी शुकशुकाट दिसून आला. शुक्रवारी गुड फ्रायडे व पाच दिवसांचा आठवडा असल्याने शनिवार व रविवार असे सलग तीन दिवस मनपा बंद राहणार आहे. सकाळी मनपात आयुक्त निमा अराेरा दाखल झाल्या,काही काळ थांबल्यानंतर त्या निघून गेल्या.