गुंठेवारीच्या बनवाबनवीत रोड हडपला

By admin | Published: May 26, 2014 07:12 PM2014-05-26T19:12:20+5:302014-05-27T19:33:48+5:30

अकोला : चार वर्षात गुंठेवारीमध्ये बनवाबनवी करीत रोडच हडपल्याचा प्रकार समोर आला आहे.

Road to grabbed by Gundehari | गुंठेवारीच्या बनवाबनवीत रोड हडपला

गुंठेवारीच्या बनवाबनवीत रोड हडपला

Next

अकोला : चार वर्षात गुंठेवारीमध्ये बनवाबनवी करीत रोडच हडपल्याचा प्रकार कीर्ती नगरात समोर आला आहे. याप्रकरणी मनपाने तातडीने कार्यवाही करून रोड मोकळा करून द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
अकोला शहरात यापूर्वी अनेक ठिकाणी नियमबा‘ गुंठेवारी मंजूर केल्याचे प्रकार उजेडात आले. अशा प्रकरणात मनपाने कारवाईही केली; मात्र आता तर गुंठेवारीमध्ये रोडच गायब केल्याचा प्रकार समोर आला आहे. मूळ अकृषक आदेशामध्ये स. नं. ४३/१चे एकूण क्षेत्र ३७ गुंठे असल्याचे ७/१२ मध्ये नमूद करण्यात आले. याच आदेशात ३७ गुंठे क्षेत्राचे १३ प्लॉटमध्ये विभाजन करण्यात आले. यातील प्लॉट क्रमांक ९ ते १२ या मध्ये क्षेत्र वाढविण्यात आले.
सन १९९२-९३ मधील सुधारित आदेशामध्ये गुंठेवारी क्षेत्र ३७ ऐवजी ४३.०६ दर्शविण्यात आले. ६.०६ गुंठे वाढवून क्षेत्राचे विभाजन करण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरातील रस्ताच गायब झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

** नियमांचे उल्लंघन...
मूळ अकृषक आदेशातील अटी क्रमांक ९ प्रमाणे रस्ते आणि नाल्या बांधून त्या पालिकेला हस्तांतरित करणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ६० फूट डी.पी. (विकास आराखडा) रस्ता १९८७ मध्येच मनपाला हस्तांतरित झालेला आहे. त्यामुळे अशा रस्त्याच्या क्षेत्राची खरेदी-विक्री करणे हे नियमांचे उल्लंघन आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

Web Title: Road to grabbed by Gundehari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.