रस्ता की ‘मड रेसिंग’चा ‘ट्रॅक’ : अकोला-अकोट मार्गावर वाहनचालकांचे हाल

By atul.jaiswal | Published: June 10, 2018 01:42 PM2018-06-10T13:42:11+5:302018-06-10T13:43:08+5:30

अकोला : रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या अकोला-अकोट मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल साचण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसानंतर शनिवारी हा मार्ग प्रचंड चिखलमय झाला होता.

 Road or 'Mud Racing' track: Road accidents on Akola-Akot road | रस्ता की ‘मड रेसिंग’चा ‘ट्रॅक’ : अकोला-अकोट मार्गावर वाहनचालकांचे हाल

रस्ता की ‘मड रेसिंग’चा ‘ट्रॅक’ : अकोला-अकोट मार्गावर वाहनचालकांचे हाल

Next
ठळक मुद्देअकोट ते यवतमाळ जिल्ह्यातील हरणी या दरम्यान १६१ ‘ए’ या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम गत काही महिन्यांपासून सुरू आहे. कंत्राटदार एम. बी. पाटील यांच्या कंपनीने सुकोडा फाट्यापासून उगवा फाट्यापर्यंत रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे. शुक्रवार, ८ जून रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी सकाळी या मार्गावरील पाचमोरी वीज उपकेंद्र ते उगवा फाटा दरम्यानच्या भागात प्रचंड चिखल साचलेला होता.

अकोला : रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या अकोला-अकोट मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल साचण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसानंतर शनिवारी हा मार्ग प्रचंड चिखलमय झाला होता. चिखलाचा थर साचलेल्या या मार्गावरून वाहने काढताना वाहनचालकांना करावी लागणारी कसरत पाहून, हा रस्ता आहे की ‘मड रेसिंग’चा ‘ट्रॅक’, असा प्रश्न येणाऱ्या-जाणाºयांना पडला होता.
प्रचंड चिखल असलेल्या मार्गावरून कार किंवा मोटारसायकल दामटण्याची शर्यत अर्थात ‘मड रेसिंग’ चा प्रकार विदेशात लोकप्रिय असून, तेथे तशा प्रकारचे ‘ट्रॅक’ बनविले जातात. भारतात मात्र हा खेळ फारसा लोकप्रिय नसल्याने आपल्याकडे असे ‘ट्रॅक’ही फार कमी पहावयास मिळतात. अकोला ते अकोट मार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाºया कंत्राटदार कंपनीने मात्र सुकोडा फाटा ते उगवा फाटा दरम्यानच्या भागात असा ‘ट्रॅक’ निर्माण करण्याचा प्रताप केला आहे.
अकोट ते यवतमाळ जिल्ह्यातील हरणी या दरम्यान १६१ ‘ए’ या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण व सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम गत काही महिन्यांपासून सुरू आहे. या महामार्गाचा एक भाग असलेल्या अकोला ते अकोट दरम्यानच्या कामाला उन्हाळ्यात सुरुवात करण्यात आली. कंत्राटदार एम. बी. पाटील यांच्या कंपनीने सुकोडा फाट्यापासून उगवा फाट्यापर्यंत रस्त्याचे खोदकाम करून ठेवले आहे. हे काम करताना आधी एका बाजूचा रस्ता तयार झाल्यानंतरच दुसºया बाजूच्या कामाला हात लावणे अपेक्षित होते; परंतु तसे न करता संपूर्ण रस्ता खोदून काम करण्यात येत आहे. खोदलेल्या मार्गावर मुरुम टाकून दबाई करण्यात आली. या महिन्याच्या सुरुवातीला गत शुक्रवार आणि शनिवारी आलेल्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल साचून वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर शुक्रवार, ८ जून रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे शनिवारी सकाळी या मार्गावरील पाचमोरी वीज उपकेंद्र ते उगवा फाटा दरम्यानच्या भागात प्रचंड चिखल साचलेला होता. या मार्गावरून जाताना वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून जावे लागत होते. चिखलामुळे काही दुचाकीस्वार रस्त्याने पडल्याने किरकोळ जखमी झाले.



‘सबस्टेशन’ ते उगवा फाट्यापर्यंतचा भाग धोक्याचा
सुकोडा फाट्यापासून सुरू करण्यात आलेल्या या रस्त्याचे काम सांगवी मोहाडी फाट्यावरील रेल्वे क्रॉसिंग व तेथून देवी मंदिरापर्यंत चांगले झालेले असल्याने या भागात फारसा चिखल साचत नाही. त्यापुढे पाचमोरी ते उगवा फाट्यापर्यंतच्या भागात मात्र प्रचंड चिखल साचतो. कंपनीने या ठिकाणी हार्ड मुरुम टाकला; परंतु त्याची व्यवस्थित दबाई न झाल्यामुळे वाहनचालकांची आणखीनच पंचाईत झाली आहे. काही ठिकाणी चिखलाचा पातळ थर साचत असल्याने दुचाकी व मोठी वाहनेदेखील घसरत असल्याचे चित्र आहे. विरुद्ध दिशेने मोठे वाहन आल्यास दुचाकीस्वारांना रस्त्याच्या खाली उतरावे लागते.

संथगतीसाठी कंपनीला बजावली नोटीस
या महामार्गाच्या अकोट ते अकोलापर्यंतच्या भागाचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने सुरुवातीपासूनच संथगतीने काम केले आहे. उन्हाळ्यात या कामाची गती खूपच मंदावली होती. या रस्त्याच्या कामासोबतच सुरू झालेल्या इतर रस्त्यांची कामे झपाट्याने सुरू असून, काही ठिकाणी तर एका बाजूच्या काँक्रिटीकरणाचेही काम झाले आहे. अकोला-अकोट मार्गाचे काम मात्र कासवगतीने सुरू आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे संबंधित कंत्राटदारास नोटीसही बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यानंतर कंपनीने कामाला वेग दिला असला, तरी त्यात प्रगती न झाल्यास कंपनीला कंत्राटही गमवावे लागू शकते, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अकोला विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब झाल्टे यांनी सांगितले.

Web Title:  Road or 'Mud Racing' track: Road accidents on Akola-Akot road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.