खेळाच्या मैदानावर रस्ता!

By admin | Published: May 23, 2014 11:10 PM2014-05-23T23:10:48+5:302014-05-27T19:41:17+5:30

अकोला शहरातील खेळाच्या मैदानासाठी आरक्षित जागेवर बेकायदेशीररीत्या रस्ता बनविण्याचे काम.

The road to the playground! | खेळाच्या मैदानावर रस्ता!

खेळाच्या मैदानावर रस्ता!

Next

अकोला - शहरातील उमरखेडमध्ये येत असलेल्या रामनगरातील सांस्कृतिक भवन व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेवर बेकायदेशीररीत्या रस्ता बनविण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करून हे काम त्वरित थांबविण्याची मागणी नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या जागेवर डीपी प्लॉटनुसार इपी १९ व इपी २० नुसार सांस्कृतिक भवन व खेळाचे मैदान दर्शविण्यात आले आहे. हे आरक्षण वगळण्याची प्रक्रिया शासन दरबारी पूर्ण झालेली नाही. या जागेवर पूर्वीच्या मालकाच्या कालावधीपासून काळा मारोती मंदिर अस्तित्वात आहे. या जागेचा वाद सध्या न्यायप्रविष्ट असून, त्यानंतरही या जागेवर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची शहनिशा करून या रस्त्याचे बांधकाम बंद करावे. तसेच सांस्कृतिक भवन व खेळाचे मैदान तयार करण्याची मागणी पवित्रकार यांनी केली आहे.

Web Title: The road to the playground!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.