दहीहंडा ते अकोला रस्त्याची थातूरमातूर डागडुजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:16 AM2020-12-08T04:16:22+5:302020-12-08T04:16:22+5:30
दहीहंडा गावाबाहेर नेवडा नाल्याच्या पुलावर अकोल्याची सीमा समाप्त होते आणि दर्यापूर तालुक्याची सीमा प्रारंभ होते. नेवडा नाल्याच्या ...
दहीहंडा गावाबाहेर नेवडा नाल्याच्या पुलावर अकोल्याची सीमा समाप्त होते आणि दर्यापूर तालुक्याची सीमा प्रारंभ होते. नेवडा नाल्याच्या पुलापासून ते दहीहंडा फाट्यापर्यंत रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. ६ डिसेंबरपासून दहीहांडा ते अकोला रस्त्याची थातूरमातूर डागडुजी सुरू करण्यात आली. डागडुजी करताना कंत्राटदार निकृष्ट साहित्य वापरत आहेत. रोडवर पडलेले मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये गिट्टी, बोल्डर न वापरता मुरुमाचा वापर होत आहे. अल्प प्रमाणात डांबरचा वापर होत आहे. निकृष्ट दर्जाचा मुरुम खड्ड्यांमध्ये टाकून त्यावर कमी डांबर टाकण्यात येत आहे, तसेच थातूरमातूर बारिक गिट्टीचा चुरा टाकण्यात येत आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर व सार्वजनिक बांधकाम विभागावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावण्यात येत आहे. काही दिवसातच डागडुजी केलेला रोड ‘जैसे थे’ होण्याची शक्यता आहे. सदर कामाकरिता शासनाकडून संबंधित ठेकेदाराला लाखो रुपये देण्यात येतात; मात्र कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संबंधित अधिकारी यांची मिलीभगत असल्यामुळे रस्त्याचे तीन-तेरा वाजत आहेत. खड्डे बुजवताना थातूरमातूर डांबर व गिट्टीचा वापर होत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याची मागणी भीमराव विठ्ठलराव कुऱ्हाडे रा. लोतवाडा यांच्यासह वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.
फोटो: