रस्त्याची चाळण; खड्ड्यात बेशरमची झाडे लावून महापालिकेचा निषेध
By आशीष गावंडे | Published: July 18, 2023 05:39 PM2023-07-18T17:39:46+5:302023-07-18T17:40:15+5:30
संत तुकाराम चौकात 'वंचित'च्या कार्यकर्त्यांचे आंदोलन
अकोला: संत तुकाराम चौक ते मलकापूर कोठारी खदान पर्यंतच्या डांबरी रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. मुख्य रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याचे पाहून मंगळवारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संत तुकाराम चौकात रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त केला.
महापालिका क्षेत्रात सामील झालेल्या मलकापूर ते संत तुकाराम चौकापर्यंतच्या मुख्य डांबरी रस्त्याचे निर्माण कार्य अतिशय दर्जाहीन असल्यामुळे रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात खड्डे चुकविण्याच्या नादात अपघात होत आहेत. रस्ता दुरुस्तीसंदर्भात यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिल्यानंतरही अद्यापपर्यंत रस्ता दुरुस्तीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला नाही. त्यामुळे महापालिका व बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून प्रशासकीय यंत्रणांचा तीव्र निषेध व्यक्त केला.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता पराग गवई, राजू गोपनारायण, विशाल गोपनारायण, अंकित गोपनारायण, अजय खंडारे, यशपाल जाधव, भाई पठाण, अमित गोपनारायण, राहुल खंडारे, आकाश गोपनारायण, फारुख पठाण, राजिक शेख, मनीष ढसाळे, उमेश शिरसाट , सुमित तायडे, भारत गोपनारायण, शरद वानखडे, सचिन वानखडे, राज गोपनारायण, शुभम गोपनारायण, बंडू पाटील, अभिजीत इंगळे, कमलेश वाहुळकर, मयूर खंडारे, प्रशांत डोंगरे, दिनेश भागानगरे, अक्षय बांनबाकोडे, शंकर यवतकर, ऋषिकेश आमले, गोपाल जायले, प्रशांत बोराडे, उद्धव अंभोरे, अजय इंगळे, विजय कोकाटे , प्रवीण गायगोळे , विक्की पाळलकर, रोशन जगताप, रवी पाटील , प्रथमेश जोशी, मयूर कुलकर्णी, साहिल डोंगरे आदि युवक व नागरिक उपस्थित होते.
प्रतिकात्मक जखमी युवकांनी केले वृक्षारोपण
रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात होऊन प्रतिकात्मक जखमी झालेल्या युवकांनी बेशरमची झाडे लावून अनोखे आंदोलन केले.