मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रोडचे काम पूर्ण, पुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:34 AM2021-03-04T04:34:54+5:302021-03-04T04:34:54+5:30
अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रोड असल्यामुळे परिसरातील चान्नी,मळसूर, उमरा,शिरपूर, चांगेफळ,राहेर, अडगाव इत्यादी गावातील नागरिकांची ...
अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा रोड असल्यामुळे परिसरातील चान्नी,मळसूर, उमरा,शिरपूर, चांगेफळ,राहेर, अडगाव इत्यादी गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पावसाळ्यात पिंपळखुटा येथील दोन नद्यांच्या संगमावरील हा पूल असल्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी राहते. त्यामुळे या रोडवरील संपूर्ण वाहतूक पावसाळ्यात ठप्प होऊन जाते. या रोडवर खामगाव बाजारपेठ असल्यामुळे या रोडवर नेहमी वर्दळ राहते.परंतु पावसाळ्यात हा रोड बंद पडत असल्यामुळे परिसरातील लोकांना २५ किमीच्या फेऱ्याने खामगावला जावे लागते.त्यामुळे परिसरातील नागरिकांना मानसिक मनस्ताप व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे संबंधित बांधकाम विभागाने सदर पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे.अशी गावकऱ्यांसह परिसरातील नागरिकांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.