सुकळी येथे रस्त्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:23 AM2021-09-12T04:23:19+5:302021-09-12T04:23:19+5:30
खेट्री : पातुर तालुक्यातील सुकळी येथे गेल्या दीड महिन्यापूर्वी दलित वस्तीतील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्याच्या ...
खेट्री : पातुर तालुक्यातील सुकळी येथे गेल्या दीड महिन्यापूर्वी दलित वस्तीतील सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम करण्यात आले. रस्त्याच्या कामापूर्वी खोदकाम करून मुरूम टाकून दबाई करणे अपेक्षित असताना, चक्क मातीवरच काँक्रिट टाकल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्याच्या मंजुरीसाठी सरपंचाची स्वाक्षरी घेण्यात आली; मात्र रस्त्याचे काम मंजूर झाल्यानंतर सरपंचाला विश्वासात न घेता संबंधितांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप सरपंचासह ग्रामस्थांनी केला आहे.
दलित वस्ती सुधारसाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. मात्र, संबंधित व कंत्राटदाराच्या मिलीभगतमुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत. सुकळी येथील रस्त्याचे काम निकृष्ट केल्याने रस्त्याची काही महिन्यांतच दुर्दशा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या मंजुरीसाठी सरपंचाला स्वाक्षरी पुरते वापरण्यात आल्याचा आरोपही होत आहे. याबाबत सचिवांची वारंवार संपर्क केला असता, त्यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
-------------------
रस्त्याच्या मंजुरीसाठी माझी स्वाक्षरी घेण्यात आली होती; परंतु रस्त्याला मंजुरात मिळाल्यानंतर मला विश्वासात न घेता रस्त्याचे काम कधी केले आणि कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले, याबाबत अद्यापही माहिती नाही.
- दिनकर वांडे, सरपंच, सुकळी.
110921\img20210830143120.jpg
फोटो