वाडेगाव बसस्थानक परिसरात मार्गाचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:13 AM2021-07-22T04:13:30+5:302021-07-22T04:13:30+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील बसस्थानक परिसरात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाहनचालकासह व्यावसायिकांकडून करण्यात येत ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील बसस्थानक परिसरात रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप वाहनचालकासह व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. नाल्याअभावी पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
बाळापूर-पातूर मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, येथील बसस्थानक परिसरातील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस नाल्याअभावी पाण्याचे डबके साचत असल्याने वाहनचालकासह नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. डबक्यामुळे परिसरात घाण साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात निर्माण झालेली समस्या संबंधित विभागाकडून तत्काळ सोडवावी, अशी मागणी होत आहे.
-----------------------------
वाडेगाव येथे बसस्थानक परिसरात निर्माण झालेल्या समस्या संदर्भात संबंधित विभागाकडे पत्र देण्यात येईल. समस्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
- चंद्रशेखर चिंचोळकर, जिल्हा परिषद सदस्य.
------------------
वाडेगाव येथील बसस्थानक परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाण्याचे डबके साचल्याने वाहन उभे करण्यास व ग्राहकांना दुकानात ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
- राजेश्वर पळसकार, ग्रामपंचायत सदस्य, वाडेगाव.