रस्त्यांची कामे संथ गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:34 AM2020-12-16T04:34:16+5:302020-12-16T04:34:16+5:30
अकाेला: शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांचे निर्माण कार्य अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे अकाेलेकरांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत ...
अकाेला: शहरातील प्रमुख सिमेंट रस्त्यांचे निर्माण कार्य अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे अकाेलेकरांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा तसेच टिळक राेड ते छत्रपती शिवाजी महाराज पार्कपर्यंतच्या रस्त्याचा समावेश आहे.
रुग्णांच्या देयकांचे ‘ऑडिट’ रखडले
अकाेला: काेराेना विषाणूच्या कालावधीत शहरातील खासगी काेविड रुग्णालयांनी रुग्णांना अव्वाच्या सव्वा दराने देयके आकारली. या बाबीचा ऊहापाेह झाल्यानंतर खासगी रुग्णालयांच्या देयकांचे ‘ऑडिट’ करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला हाेता. ही प्रक्रिया रखडल्याची माहिती आहे.
तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव
अकाेला: मागील काही दिवसांत वातावरणात बदल झाल्याचा परिणाम शेत पिकांवर झाला असून, तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तुरीच्या पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीने हल्लाबाेल केल्यामुळे शेतकऱ्यांसमाेर संकट ठाकले आहे.
काेराेनाबाबत जनजागृती
अकाेला: थंडीच्या दिवसांमध्ये काेराेना विषाणूची लाट येण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाकडून काेराेनाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिक गाफील राहत असून, घराबाहेर फिरताना ताेंडाला रूमाल किंवा मास्क बांधत नसल्याचे चित्र आहे.
अगरवेसची दुरवस्था
अकाेला: शहरात इतिहासाची एकमेव साक्ष देणाऱ्या जुने शहरातील अगरवेसची महापालिकेच्या देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. गतवर्षी वेसची पडझड थांबावी या उद्देशातून तात्पुरती डागडुजी करण्यात आली हाेती.
गांधी चाैकाला अतिक्रमणाचा विळखा
अकाेला: शहरातील प्रमुख बाजारपेठ वसलेल्या गांधी चाैकाला लघू व्यावसायिक व फेरीवाल्यांनी विळखा घातला आहे. रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवर रेडिमेड ड्रेस, प्लास्टिकची खेळणी व किरकाेळ साहित्याची विक्री केली जात असून, अतिक्रमणाची समस्या दूर करणाऱ्या मनपाच्या अतिक्रमण विभागाने झाेपेचे साेंग घेतले आहे.
जनता बाजारात अतिक्रमण
अकाेला: जनता भाजी बाजारच्या जागेवर महापालिका प्रशासनाकडून व्यावसायिक संकूलाची उभारणी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रशासनाने भाजी बाजारातील हरासी व दैनंदिन व्यवसायावर निर्बंध आणले आहेत. असे असतानाही भाजी व्यावसायिकांनी जनता भाजी बाजारात अतिक्रमण थाटल्याचे चित्र आहे.
शहरात ऑटोचालकांची मनमानी
अकोला: वाहतूक शाखा पाेलिसांच्या डाेळ्यादेखत गांधी रोड, सिटी काेतवाली चाैक तसेच खुले नाट्यगृह चाैकात ऑटाेचालकांच्या मनमानीमुळे वाहतूक विस्कळीत होत आहे. थांबा नसताना मनमानीरित्या चौकात ऑटाे उभे केले जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या दूर करण्याची मागणी हाेत आहे.
पंचायत समितीसमाेर खड्डे
अकाेला: शहरातील पंचायत समिती कार्यालयासमाेरील मुख्य रस्त्याचे निर्माण कार्य करण्यात आले; परंतु पशुवैद्यकीय दवाखाना ते मनपाच्या वाणिज्य संकुलापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती न करता काम बंद करण्यात आल्याचा प्रकार समाेर आला आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.