रस्ते निर्मनुष्य, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:18 AM2021-05-14T04:18:15+5:302021-05-14T04:18:15+5:30
शहरातील आस्थापना नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद ठेवली आहेत. घराबाहेर नागरिक पडत नाहीत. शिवाय दवाखाना, मेडिकलला जाणारे मास्क लावून होते. ...
शहरातील आस्थापना नागरिकांनी स्वंयस्फूर्तीने बंद ठेवली आहेत. घराबाहेर नागरिक पडत नाहीत. शिवाय दवाखाना, मेडिकलला जाणारे मास्क लावून होते. त्यामुळे महसूल, पोलीस व नगर परिषद पथकाला दिवसभर एकही दंडात्मक कारवाई करता आली नाही. चौकात वाहतूक पोलीस व जवानांचा दलाचा खडा पहारा आहे. तर तालुक्यातील रस्त्यावर अकोट ग्रामीण पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आहेत. वैद्यकीय सेवा, लसीकरणशिवाय कुणालाही आत-बाहेर प्रवेश देण्यात येत नसल्याने शहर व ग्रामीण भागात कडक बंदोबस्त आहे.
आतापर्यंत एक लाखावर दंड वसूल
पोलीस, महसूल व नगर परिषदेच्या पथकाने शहर व ग्रामीण भागात फिरून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून एक लाखावर दंड वसूल केला. आहे. लॉकडाऊन काळात पोलिसही मदत व सेवा देण्यासाठी सरसावले आहेत. शिवाय सोशल मीडियावर कोरोना जनजागृती करण्यावर भर दिला जात आहे. प्रभारी अधिकारी विलास पाटील, शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड, सहायक पोलीस निरिक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाचपोर, डाखोरे लक्ष ठेवून आहेत.
लसीकरण केंद्रावर जलसेवा
लसीकरण केंद्रावर गर्दी उसळत आहे. कडक उन्हाळा असल्यामुळे गोलबाजार लसीकरण केंद्रावर पोलीस कर्मचारी वीरेंद्र लाड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी थंडगार पाणी उपलब्ध करून देत सेवा देत आहेत.
पोलीस कर्मचाऱ्याची मानवता
शहरातील पोलीस अंमलदार हिंमत दंदी यांनी शहरातील मजीदिया प्लाॅट येथील दोन मुले व नवगाजी प्लाॅट येथील एक मुलगी तर इंदिरानगर येथील दोन मुलांना स्वखर्चाने नवीन कपडे देऊन त्यांची ईद गोड केली आहे.
फोटाे: