अकोल्यात बनावट नोटांचे आमिष देणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 02:02 PM2018-05-05T14:02:46+5:302018-05-05T14:02:46+5:30
अकोला: चलनातील खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीनपट अधिक नोटा देण्याचे आमिष देऊन बनावट नोटा माथी मारणाऱ्या दरोडेखोरांच्या एका टोळीचा शुक्रवारी पर्दाफाश करण्यात आला.
अकोला: चलनातील खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीनपट अधिक नोटा देण्याचे आमिष देऊन बनावट नोटा माथी मारणाऱ्या दरोडेखोरांच्या एका टोळीचा शुक्रवारी पर्दाफाश करण्यात आला. मध्यवर्ती बसस्थानकावर नोटांची देवाण-घेवाण सुरू असतानाच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने छापा टाकून तब्बल ३२ लाख रुपयांच्या बनावट व खऱ्या नोटा जप्त केल्या.
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील वरुट येथील रहिवासी कमल अफसर शहा, याच तालुक्यातील कलगाव येथील मोहम्मद शाकीर अब्दुल वकील व दिग्रस येथील मोतीनगरमधील रहिवासी हुसेन बग्गू गारवे तसेच वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील आसीफ खा शौकत खा व रिना नामक महिला या पाच जणांच्या टोळीने अनोखा फंडा वापरत अनेकांना अशा पध्दतीने गंडविल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला प्राप्त झाली होती. ही टोळी कुणाला तरी हेरू न १ लाख रुपयांच्या बदल्यात तब्बल ४ ते ५ लाख रुपये खºया नोटा देण्याचे आमिष देत होते. एक लाख रुपयांच्या मोबदल्यात ४ ते ५ लाख मिळत असल्याने अनेकांनी या टोळीशी संपर्क साधला. समोरील व्यक्ती १ लाख रुपयांच्या खºया नोटा घेऊन येताच ही टोळी त्या नोटा घेऊन पसार होत होती. हा प्रकार विशेष पथकाच्या निर्दशनास आल्यानंतर त्यांनी एक बनावट ग्राहक तयार करू न सदर टोळीशी संपर्क साधला. या टोळीने सदर ग्राहकाला चलनातून बाद झालेले ३० लाख रुपये देण्याचे आमिष दिले. या मोबदल्यात ग्राहकाने या टोळीला खºया नोटांचे १० लाख रुपये देण्याचा सौदा ठरला.
दरम्यान,मध्यवर्ती बसस्थानकावर हा व्यवहार सुरू असतानाच दबा धरून असलेल्या विशेष पोलीस पथकाने या टोळीतील कमल अफसर शहा, मोहम्मद शाकीर अब्दुल वकील, हुसेन बग्गू गारवे, आसिफ खा शौकत खा यांना अटक केली. त्यांच्याकडून बनावट व मुलांच्या खेळण्यातील नोटा जप्त केल्या. या टोळीतील रिना नामक महिला मात्र फरार होण्यात यशस्वी झाली. या पाचही आरोपींवर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.