अकोला शहरातील महावितरणच्या ‘एटीपी’ केंद्रावर दरोडा; साडेपाच लाखांची रक्कम लंपास; तीन आरोपी गजाआड
By atul.jaiswal | Published: December 22, 2017 01:07 PM2017-12-22T13:07:50+5:302017-12-22T17:35:27+5:30
अकोला : अकोला शहरातील दुर्गा चौक स्थित महावितरणच्या वीज बिल केंद्रावर (एटीपी) अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री दरोडा घालून ५ लाख ६० हजार २४० रुपयांची लंपास केली. याप्रकरणी शुक्रवारी सकाळी रामदास पेठ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अकोला: महावितरणच्या दुर्गा चौकातील एटीपी(विद्युत बिल भरणा) केंद्रांवर दरोडा घालून ५ लाख ६0 हजार रूपयांचे रोकड पळविण्याची घटना गुरूवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास घडली. दरोडखोरांना रोकड नेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे(४५) यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांचे पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने दरोडा घालणाºया तिघा जणांच्या पहाटे मुसक्या आवळल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शुक्रवारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत दिली.
विद्युत भवनाच्या मागील परिसरात वीज बिल भरणा केंद्र आहे. या केंद्रात गुरुवारी दिवसभरात नागरिकांनी भरलेल्या वीज बिलाची ५ लाख ६० हजार २४० रुपयांची रक्कम गोळा झाली. ग्राहकांनी भरलेली रक्कम रात्रभर याठिकाणीच ठेवण्यात येते. याची माहिती दरोडेखोरांना असल्याने, त्यांनी गुरूवारी रात्री ११.३0 वाजताच्या सुमारास एटीपी केंद्राचे पत्र्याचे छत तोडून आत प्रवेश केला. यावेळी याठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षक सुधीर मधुकर लाळे यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी लाळे यांच्यावर हल्ला करून त्यांच्या चेहºयावर व दोन्ही पायावर धारदार हत्याराने वार करून जखमी केले आणि एटीपी केंद्रातील मशीन फोडून, त्यामध्ये गोळा झालेली ५ लाख ६० हजार २४० रुपयांची रक्कम घेऊन दरोडखोर पसार झाले. या घटनेची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. यावेळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले होते. शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांचे विशेष पथक व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकाने गतीने तपास करून शहरातील देशमुख फैल, लक्कडगंज परिसरात दडून बसलेले दरोडखोर संतोष राजाराम भटकर(३२), वसंत नारायण महाजन आणि कालु मेहमुद खान यांना अटक केली. त्यांच्याकडून दरोड्यातील ५ लाख ६0 हजार रूपयांपैकी २५ हजार रूपयांची रोकड जप्त केली. अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे, पोलीस निरीक्षक विलास पाटील उपस्थित होते. रामदासपेठ पोलिसांनी भांदवि कलम ३९४(३४), २0१ नुसार गुन्हा दाखल केला.
सीसी कॅमेरा बंद करून लुटली रोकड
दरोडेखोरांनी एटीपी केंद्राचे पत्र्याचे छत तोडून आत प्रवेश केला आणि दरोडा घालण्यापूर्वी एटीपी केंद्रातील सीसी कॅमेºयाची केबल वायर कापली आणि रोकड लुटून नेली. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार संतोष राजाराम भटकर हा असून, तो इलेक्ट्रीशियनचे काम करतो.
क्राईम कंट्रोलमध्येच: कलासागर
शहरातील होणाºया हत्या, लूटमार, चेन स्नॅचिंगच्या वाढत्या घटनांवर पत्रकारांनी चिंता व्यक्त करीत, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांना, पोलिसांचे गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटले का? असा प्रश्न विचारला. त्यावर कलासागर यांनी, हत्याकांडातील सर्वच आरोपी अटक झाले असून, क्राईम कंट्रोलमध्ये असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गुन्हेगारांना तडीपार करण्यासाठीचे प्रस्ताव तयार करण्यात येत आहेत. लवकरच प्रमुख मार्गंवर सीसी कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.