रोहणखेड परिसरात पेरणीचे नियोजन बदलणार!

By admin | Published: July 3, 2017 01:32 AM2017-07-03T01:32:15+5:302017-07-03T01:32:15+5:30

रोहणखेड : मृग नक्षत्रातच पाऊस रुसल्याने याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज असून, त्यांना आता केवळ पावसाचीच प्रतीक्षा आहे.

Rohingkhad area will change the sowing schedule! | रोहणखेड परिसरात पेरणीचे नियोजन बदलणार!

रोहणखेड परिसरात पेरणीचे नियोजन बदलणार!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
रोहणखेड : मृग नक्षत्रातच पाऊस रुसल्याने याचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना बसत आहे. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी सज्ज असून, त्यांना आता केवळ पावसाचीच प्रतीक्षा आहे.
गत पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामे जोमात सुरू केली होती. सध्या शेतातील मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी पावसाळ्याला वेळेवर सुरुवात होईल, असे शेतकऱ्यांना वाटत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते खरेदीला सुरुवात केली होती. मात्र मृग नक्षत्रात सुरुवातीनंतरही पावसाचे वातावरण दिसत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी खते, बी-बियाण्यांची खरेदी थांबवली. त्यामुळे शहरातील कृषी सेवा केंद्रात शेतकऱ्यांची गर्दी ओसरली आहे. मृगाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातील पेरण्या उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असतात. मागीलवर्षी मृग नक्षत्रातच पाऊस पडल्याने पेरण्या लवकर आटोपल्या होत्या. यावेळी मात्र जून महिना पूर्ण आटोपला असून, पाऊस पडला नसल्याने पेरण्या कधी होतील, हे आताच ठामपणे सांगणे कठीण आहे. मूग, उडिदाच्या पेरणीचा कालावधी जात असल्याने शेतकरी दुसऱ्या पिकाकडे वळतील, असा अदांज आहे. पेरण्या लांबत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पावसाचा लहरीपणा असाच राहिला, तर उत्पादन खर्चही निघते की नाही, याची शाश्वती नाही, असे शेतकऱ्यांनी सांगितले. पाऊस लांबल्याने पेरण्या ठप्प आहेत. त्याप्रमाणेच तालुक्यात पाणी व चारा टंचाईच्या तीव्रतेने डोके वर काढले आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी करावी लागलेली पायपीट अजूनही सुरूच आहे. नदी-नाले तसेच विहिरी तलाव कोरडे पडले आहेत, तर कुठे पाणी साठा असूनही नियोजनशून्य कार्य पद्धतीमुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे वास्तव आहे. जनावरांचा चारा संपण्याच्या मार्गावर आहे. पावसाच्या आगमनावर छत्री, रेनकोट विक्रेते याचा व्यवसाय अवलंबून असतो. पाऊस लांबल्याने व्यापार मंदावला आहे. पाऊस नसल्याने पुढील सर्व प्रक्रिया मंदावल्या आहेत. नागरिक हात आखडून पैसा खर्च करीत आहेत. पेरणीला सुरुवात झाली असती, तर शेतमजुरांना रोजगार मिळाला असता.

Web Title: Rohingkhad area will change the sowing schedule!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.