रोहयो उपजिल्हाधिकारीपदाचा प्रभार शेलार यांच्याकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:07+5:302021-06-01T04:15:07+5:30
............................................... जि.प. ‘सीइओं’नी घेतली बैठक अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी जिल्हा परिषद ...
...............................................
जि.प. ‘सीइओं’नी घेतली बैठक
अकोला : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटियार यांनी सोमवारी जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागप्रमुखांची बैठक घेतली. पंधराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीतून करावयाची विकासकामे तसेच इतर कामांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
........................................................
सवलतीच्या दरात धान्य वाटपाचे नियोजन
अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयानुसार जिल्ह्यातील केशरी रेशनकार्डधारकांना जून महिन्यात सवलतीच्या दराने धान्याचे वितरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांनी सांगितले.
............................................
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ !
अकोला : खरीप हंगामातील पेरण्या तोंडावर आल्याने, जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे बियाणे व खतांचा खर्च भागविण्याकरिता पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पीक कर्जासाठी बँकांमध्ये सादर करावयाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव शेतकऱ्यांना करावी लागत आहे.