शास्तीच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपची भूमिका दुटप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:40 AM2021-09-02T04:40:09+5:302021-09-02T04:40:09+5:30

एखादी खासगी बँकदेखील वर्षाकाठी २४ टक्के व्याजाची आकारणी करीत नाही; परंतु मनपा प्रशासन अपवाद असून, मालमत्ता कर थकीत असलेल्या ...

The role of the ruling BJP on the issue of punishment is twofold | शास्तीच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपची भूमिका दुटप्पी

शास्तीच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपची भूमिका दुटप्पी

Next

एखादी खासगी बँकदेखील वर्षाकाठी २४ टक्के व्याजाची आकारणी करीत नाही; परंतु मनपा प्रशासन अपवाद असून, मालमत्ता कर थकीत असलेल्या सर्वसामान्य अकाेलेकरांना प्रतिमहिना दाेन टक्क्यांनुसार वर्षाकाठी २४ टक्के व्याज आकारत असल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले. प्रभारी आयुक्त निमा अराेरा यांना जनहिताच्या मुद्यावर छेडले असता त्या ‘पाहू, बघू’असे सांगून वेळ निभावून नेतात. शास्तीच्या मुद्यावर त्या ठाम बाेलतात. ही बाब याेग्य नसल्याचे मिश्रा म्हणाले. काेरानाची परिस्थिती पाहता मनपाने एक वर्षासाठी शास्ती अभय याेजना राबवावी; अन्यथा तीव्र आंदाेलन छेडणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला विराेधी पक्षनेता साजीद खान पठाण, राकाँचे नगरसेवक अब्दुल रहीम पेंटर, सेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके, अनिता मिश्रा, सपना नवले, प्रमिला गीते, नगरसेवक गजानन चव्हाण आदींची उपस्थिती हाेती.

टाॅवरप्रकरणी शासनाकडे तक्रार

अनधिकृत माेबाइल टाॅवरला दिली जाणारी परवानगी संशयास्पद असून, यामध्ये अनेकांचे हात ओले झाल्याचा संशय राजेश मिश्रा यांनी व्यक्त केला. नागरिकांच्या मालमत्ता, हाॅटेल, मंगल कार्यालयांना सील लावले जात असताना टाॅवरविराेधात एकही कारवाई का नाही, असे विचारत आजच्या सभेतील ठरावाची शासनाकडे तक्रार करणार असल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

आ. शर्मा यांचे पत्र केले सार्वजनिक

भाजपचे ज्येष्ठ आमदार गाेवर्धन शर्मा यांनी शहरवासीयांसाठी दिलेली रुग्णवाहिका मनपाकडून परत का घेतली, यासंदर्भातील आ. शर्मा यांचे पत्र साजीद खान पठाण यांनी सार्वजनिक केले. रुग्णवाहिका चालविण्यास मनपा सक्षम नसून, काेराेना काळात सदर वाहन पडून असल्याची खंत आ. शर्मा यांनी पत्रात व्यक्त केली. या पत्रामुळे खुद्द भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला सत्तापक्षावर विश्वास नसल्याचा घणाघाती हल्लाबाेल साजीद खान यांनी केला.

Web Title: The role of the ruling BJP on the issue of punishment is twofold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.