रोटरीतर्फे फिरते नेत्र रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:09 AM2021-05-04T04:09:18+5:302021-05-04T04:09:18+5:30
या अभियानात अकोला शहर, सिंधी कॅम्प,उमरी, भौरद, व्याळा, रिधोरा, पारस, निंबा, भोरद, बाळापूर,वाडेगाव, सस्ती, देगाव, नकाशी, मोरगाव भाकरे, निमकर्दा, ...
या अभियानात अकोला शहर, सिंधी कॅम्प,उमरी, भौरद, व्याळा, रिधोरा, पारस, निंबा, भोरद, बाळापूर,वाडेगाव, सस्ती, देगाव, नकाशी, मोरगाव भाकरे, निमकर्दा, धोतर्डी, दधम, गांधिग्राम, चोहट्टा, हिरपूर, कान्हेरी, तरोडा, कावसा, अकोट, निंभोरा, वल्लभ नगर, उगवा, कासली, म्हतोडी, मुंडगाव, सौदळा आदी गावांत नेत्र रुग्णांची मोफत नेत्रतपासणी शिबिरे घेवून रुग्ण तपासणी करण्यात आली. या महिन्यात वरील गावांतील १८६१ रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये ६५५ रुग्णांना चष्मे वितरीत करण्यात आली. तर ३२ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. निवड झालेल्या मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
...............
कामगार नेते काेथळकर यांना अभिवादन
अकाेला : . अकोला शहरात ५२ जिनिंग व सावतराम व मोहता मिलमध्ये तीस वर्षे कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या काका काेथळकर यांना कामगारदिनी अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सिद्धार्थ शर्मा, नगरसेवक गिरीश जोशी, कामगार नेते उमाकांत कवडे उपसिथत हाेते. सूत्रसंचालन अमोल इंगळे तर प्रास्ताविक गिरीश जोशी यांनी केले तर प्रकाश भुसारी यांनी आभार मानले.
.......................................
कोरोना रुग्णालयात कॅमेरे लावा
अकोला : अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याचे प्रसारण बाहेर नातेवाईकांना दाखवावे, अशी मागणी यूथ एमआयएमने निवासी उपजिल्हाधिकारी खडसे यांच्याकडे केली. तसेच खासगी रुग्णालयांना बिलाची मर्यादा असावी अशी मागणी आसिफ अहमद खान यांच्या देखरेखीखाली युवा अध्यक्ष इरफान खान यांच्या नेतृत्वाखाली चांद खान, इम्रान खान रब्बानी, मिर्झा नावेद, शेख इरशाद, मोहम्मद समीर यांनी केली.
........................................