वऱ्हाडातील १३ शेतकऱ्यांना रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:08 PM2020-02-21T13:08:24+5:302020-02-21T13:08:30+5:30
कृषी दीपस्तंभ पुरस्कार यंदा वºहाडातील १३ शेतकºयांना दिला जाणार आहे.
अकोला : गत आठ वर्षांपासून शेतकऱ्यांना दिला जाणारा रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार यंदा वºहाडातील १३ शेतकºयांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार घोषित करण्यापूर्वी निवड झालेल्या शेतकºयांच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन त्यांच्या कामाचा अभ्यास केल्याची माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष उदय वझे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रोटरी क्लब आॅफ अकोला, जय गजानन कृषी मित्र परिवार व महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे आयोजित रोटरी कृषी दीपस्तंभ पुरस्कार -२०२० वितरण कार्यक्रम २३ फेब्रुवारी रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात घेण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी येथील एका खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रोटरीचे घनश्याम चांडक, प्रकल्प प्रमुख श्रीकांत पडगिलवार, जे.टी. कराळे, गिरीष नानोटी, मोहन सोनोने, नरेंद्र देशमुख यांची उपस्थिती होती. पुरस्कारासाठी अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकºयांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार वितरण सोहळ््याला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम. भाले, राजेशकुमार अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे, डॉ. नानासाहेब चौधरी, मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे, कृषी विकास अधिकारी प्रभाकर मानकर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याचेही वझे यांनी सांगितले.
या शेतकºयांची पुरस्कारासाठी निवड
प्रकाश पारसकर, किशोर धोटे, रमेश गणेशपुरे, प्रवीण सोनोने, दिलीप आगळे, जनार्दन दाणे, अबुल शकील अब्दुल रशीद, श्रीराम मालठाणे, डॉ. हेमंत देशमुख, गुलाबराव घुईकर, अरुण देशमुख व त्यांची पत्नी लता देशमुख, किशोर खोले, जयेश देशमुख या शेतकºयांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच वंदना लांडे यांना जय गजानन भक्ती प्रेरणा पुरस्कार, वैष्णवी नवलखे यांना शिक्षण प्रेरणा पुरस्कार, प्रभाकर मालोकार यांना रोटरी कृषी सेवा उत्कृष्ट प्रतिनिधी पुरस्कार आणि देवानंद रणवीर यांना उत्कृष्ठ कृषी विस्तार सेवा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.