‘आरपीएफ’च्या पोलीस निरीक्षकांसह तिघे निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 03:32 PM2019-01-13T15:32:16+5:302019-01-13T15:32:21+5:30
अकोला : गायगाव पेट्रोल डेपोतील पेट्रोल चोरी प्रकरणात निष्काळजी करणाऱ्या ‘आरपीएफ’चे पोलीस निरीक्षक विनोद कुमार लांजीवार, या ठाण्यातील पोलीस कर्मचारी आर. एन. यादव आणि प्रशांत मगर यांना निलंबित करण्यात आले आहे.
अकोला : गायगाव पेट्रोल डेपोतील पेट्रोल चोरी प्रकरणात निष्काळजी करणाऱ्या ‘आरपीएफ’चे पोलीस निरीक्षक विनोद कुमार लांजीवार, या ठाण्यातील पोलीस कर्मचारी आर. एन. यादव आणि प्रशांत मगर यांना निलंबित करण्यात आले आहे. रेल्वेच्या पेट्रोल वॅगनमधील पेट्रोल चोरी करताना उरळ पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. त्यामुळे आरपीएफचा कारभार रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास येताच त्यांना निलंबित केल्याच्या वृत्ताला भुसावळ रेल्वे मंडळाचे सुरक्षा आयुक्त अजय प्रकाश दुबे यांनी दुजोरा दिला आहे.
उरळचे ठाणेदार सतीश पाटील यांनी आॅगस्ट महिन्यामध्ये रेल्वे वॅगनमधील तसेच कंपन्यांच्या डेपोतील पेट्रोल चोरट्यांना रंगेहात अटक केली होती. ७ आॅगस्ट रोजी रात्री ठाणेदर पाटील यांच्यासह कर्मचाºयांनी रात्रभर पाळत ठेवून पेट्रोल चोरट्यांची मोठी टोळीच जेरबंद केली होती. यामध्ये साहब खान समशेर खान, सुधाकर भिकाजी रनवरे, अक्षय प्रकाश आगरकर, रूपेश रमेश भाकरे, गणेश रामकृष्ण भाकरे, शिवहरी प्रकाश भाकरे या टोळीचा समावेश होता. या टोळीतील तिघे जण फरार होण्यात यशस्वी झाले होते. याप्रकरणी गायगाव डेपोचे कार्यपालन अधिकारी गोविंदकुमार मुंदडा यांच्या तक्रारीवरून उरळ पोलिसांनी या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला; मात्र काही दिवसांतच या प्रकरणाचा तपास शेगाव आरपीएफकडे देण्यात आला. त्यांच्या चौकशीत हा प्रकार आरपीएफच्या पाठबळामुळेच झाल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक विनोद लांजीवार, पोलीस कर्मचारी आर. एन. यादव आणि प्रशांत मगर यांना निलंबित करण्यात आले आहे.