सायवणी येथे दोन दिवसांत पाणीपट्टीची २.५० लाख रुपयांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:17+5:302021-03-16T04:19:17+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील सायवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार शांताराम ताले यांनी स्वीकारताच दोन दिवसांमध्ये पाणीपट्टीचे २.५० लाख ...
खेट्री : पातूर तालुक्यातील सायवणी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा पदभार शांताराम ताले यांनी स्वीकारताच दोन दिवसांमध्ये पाणीपट्टीचे २.५० लाख रुपयांची वसुली केली असून, पाणपट्टी थकीत असलेल्या १५ नळ कनेक्शनधारकांवर कारवाई करून त्यांचे कनेक्शन कट केले.
गावातील विकास व्हावा, या उद्देशाने शांताराम ताले यांच्या पॅनलच्या सातपैकी सात सदस्य गावकऱ्यांनी निवडून दिले. शांताराम ताले यांनी निवडणून येताच कामाला सुरुवात केली आहे. दोन दिवसांमध्ये पाणीपट्टीचे अडीच लाख रुपयांची वसुली करून १५ कनेक्शनधारकांवर कारवाई केली आहे. यावेळी सरपंच शांताराम ताले, उपसरपंच ज्योती बुंदे, सचिव जे. एस. मुसळे, सदस्य भीमराव कौसकार, मनीषा ताले, उज्वला ताले, कीर्ती निलखन, ग्रामपंचायत कर्मचारी भाऊराम राऊत, रोजगार सेवक रामेश्वर कौसकार उपस्थित होते. तसेच थकीत असलेले नळ कनेक्शनधारकांनी त्वरित पणीपट्टी वसुली भरून ग्रामपंचायतला सहकार्य करावा, असे आवाहन ग्रा. पं. प्रशासनाकडून करण्यात आले आहे.