आसरा रस्त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:19 AM2021-03-16T04:19:52+5:302021-03-16T04:19:52+5:30

शहाण्यांनो चालण्याकरिता रस्ता देण्याची मागणी करीत दि.२६ जानेवारी रोजी हिरपूर रस्त्यावरील उड्डाणपुलावर ‘हम चालीस संघटने’ने केले होते. आमदार बळवंत ...

Rs 5 crore sanctioned for Asara Road | आसरा रस्त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर

आसरा रस्त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर

Next

शहाण्यांनो चालण्याकरिता रस्ता देण्याची मागणी करीत दि.२६ जानेवारी रोजी हिरपूर रस्त्यावरील उड्डाणपुलावर ‘हम चालीस संघटने’ने केले होते. आमदार बळवंत वानखडे यांच्या मदतीने सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडून आश्वासन मिळाल्यामुळे त्याच दिवशी दुपारी आंदोलन मागे घेण्यात आले होते. या रस्त्याच्या कामासाठी अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी पाच कोटी रुपयांची तरतूद करवून घेतली. अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना जोडणा-या आसरा रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. आसरा रस्त्यासाठी पाच कोटी रुपये मंजूर करून घेतल्यामुळे हिरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल गडवे यांनी आमदार बळवंत वानखडे यांनी हिरपूर येथे भेट दिली असता त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच काजल रवी शिंदे, सदस्य नंदू गाडवे, प्रशांत बोळे, विक्की पांडे, प्रमोद तायडे तसेच संस्थापक अध्यक्ष हमचालीस संघटना बबनराव डाबेराव, जिल्हा काँग्रेस रोहित सोळंके, रितेश देशमुख, दिवाकरजी, विधानसभा अध्यक्ष काँग्रेस शहाबुद्दीन, जिल्हा सरचिटणीस काँग्रेस बंडू डाखोरे, माजी उपसभापती सुभाष राऊत, बाळासाहेब बाजड उपस्थित होते. (वा.प्र.) ८ बाय १० (फोटो)

Web Title: Rs 5 crore sanctioned for Asara Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.