आरटीईची प्रवेश प्रक्रिया जाचक; विद्यार्थी राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:13 AM2021-06-30T04:13:20+5:302021-06-30T04:13:20+5:30
विद्यार्थ्यांची अंतर्गत निवड झालेली असताना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शिक्षण विभागाने लादलेल्या जाचक अटी व ...
विद्यार्थ्यांची अंतर्गत निवड झालेली असताना शिक्षणाच्या मूलभूत हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. शिक्षण विभागाने लादलेल्या जाचक अटी व नियमांमुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर प्रक्रियेचे मार्च महिन्यात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून घेण्यात आले. या प्रक्रियेमध्ये निवड झालेला विद्यार्थी हा किती किलोमीटरच्या अंतरावर रहिवासी असावा हे ठरविण्याचे काम संबंधित विभाग करीत आहे. त्यामुळे अनेक पालकांची आर्थिक स्थिती बिकट असूनही पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी शहरात घर भाड्याने घेऊन राहावे लागत आहे. संबंधित विभागाने ही अट तत्काळ रद्द करावी, कारण निवड झालेला विद्यार्थी कुठलाही असो त्याला कोणत्याही शाळेत प्रवेश घेऊन शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अर्जासोबत जवळच्या ठिकाणी अथवा शहरात भाड्याने राहत असल्याबद्दल रजिस्टर करारनामादेखील इतर कागदपत्रासोबत दाखल करण्याचा मनमानी नियम शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे हजारो विद्यार्थी हक्कापासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. या जाचक अटी व नियम तत्काळ रद्द करून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशित करण्याच्या सूचना संबंधित शाळांना देण्यात याव्यात, अन्यथा ५ जुलैपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला. निवेदनावर ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष विलास नसले, जि.प.संघाचे सदस्य जयप्रकाश रावत, तालुका अध्यक्ष प्रा.एल.डी. सरोदे, ग्रामीण पत्रकार संघाचेे सल्लागार संजय उमक, शहर अध्यक्ष अथरखान, संतोष माने, निलेश सुुखसोहळे, मोईज शेख, उमेश साखरे, शफीखान पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.