आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; १८१७ विद्यार्थी ठरले पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:14 AM2021-06-10T04:14:05+5:302021-06-10T04:14:05+5:30

अकाेला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठी ११ जूनपासून संबंधित शाळेत कागदपत्रांची पडताळणी हाेणार असून, त्यानंतरच प्रवेशाची ...

RTE admission process from tomorrow; 1817 students became eligible | आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; १८१७ विद्यार्थी ठरले पात्र

आरटीई प्रवेश प्रक्रिया उद्यापासून; १८१७ विद्यार्थी ठरले पात्र

Next

अकाेला : शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत (आरटीई) शाळा प्रवेशासाठी ११ जूनपासून संबंधित शाळेत कागदपत्रांची पडताळणी हाेणार असून, त्यानंतरच प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार ८१७ विद्यार्थ्यांची निवड हाेणार असून, ही निवड तात्पुरती असणार आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार जिल्ह्यात आरटीई अंतर्गत १ हजार ९६० जागा असून, ४ हजार ७०७ अर्ज प्राप्त झाले हाेते. या जागांमध्ये खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव आहेत; तसेच समाजातील आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. प्रवेशासाठी पहिली साेडत ७ एप्रिल रोजी ऑनलाइन काढली हाेती.

आता निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २० दिवसांचा कालावधी देण्यात येणार असून, साेडतीमध्ये संधी मिळालेल्या पाल्यांच्या पालकांना मूळ कागदपत्रे, छायांकित प्रती व अन्य दस्तावेज जमा करावे लागणार आहेत.

Web Title: RTE admission process from tomorrow; 1817 students became eligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.