आरटीओने निश्चित केले रुग्णवाहिकेचे भाडेदर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:18 AM2021-05-16T04:18:03+5:302021-05-16T04:18:03+5:30
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी शहरातील रुग्णवाहिका चालकांना दर निश्चितीचे पत्र प्रदान केले. रुग्णवाहिका चालकांनी निश्चित दरापेक्षा अधिक ...
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी शहरातील रुग्णवाहिका चालकांना दर निश्चितीचे पत्र प्रदान केले. रुग्णवाहिका चालकांनी निश्चित दरापेक्षा अधिक आकारणी केल्यास किंवा नागरिकांकडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित रुग्णवाहिका चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा व नियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिला आहे. रुग्णवाहिकेतून कोविड रुग्णाची वाहतूक करावयाची असल्यास, उपरोक्त दराव्यतिरिक्त पीपीई किट व वाहन निर्जंतुकीकरणासाठी एकूण ८०० रुपये अतिरिक्त भाडे द्यावे लागणार आहे.
असे आहेत दर...
मारुती व्हॅन (मनपा क्षेत्र) ५०० रुपये प्रति एक फेरी (२५ किमीपर्यंत), जिल्ह्याबाहेर १ हजार रुपये (११ रुपये प्रति किमी), टाटा सुमो व मॅटॅडोर (मनपा क्षेत्र) ६०० रुपये प्रति एक फेरी (२५ किमी), मनपा क्षेत्र सोडून १४०० रुपये, जिल्ह्याबाहेर १२ रुपये प्रति किमी, टाटा ४०७, स्वराज, मझदा मनपा क्षेत्र ७०० रुपये प्रति फेरी (२५ किमी), मनपा क्षेत्र सोडून १३०० रुपये, जिल्ह्याबाहेर १४ रुपये प्रति किमी आणि आयसीयू किंवा वातानुकूलित वाहने (मनपा क्षेत्र), मनपा क्षेत्र वगळता, जिल्ह्याबाहेर नमूद दरात १५ टक्क्यांनी वाढ असे दर निश्चित केले आहेत.