स्वस्ती प्रदर्शनाच्या फायलीचा घोळ सुरूच; जिल्हा परिषद अध्यक्षांना माहिती देण्यास टोलवाटोलवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:23 PM2018-03-13T13:23:06+5:302018-03-13T13:23:06+5:30
अकोला: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्वस्ती प्रदर्शनाच्या संदर्भातील माहितीच्या फाइल देण्यास अधिकारी-कर्मचाºयांनी कमालीची टाळाटाळ चालवली आहे.
अकोला: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून स्वस्ती प्रदर्शनाच्या संदर्भातील माहितीच्या फाइल देण्यास अधिकारी-कर्मचाºयांनी कमालीची टाळाटाळ चालवली आहे. पंधरा दिवसातही माहिती न देता जिल्हा परिषद अध्यक्षांना झुलवत ठेवण्याचा प्रकार घडत आहे. विशेष म्हणजे, त्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी शुक्रवारी संबंधितांना दुसºयांदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अमरावती विभागातील महिला स्वयंसाहाय्यता गटांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी, या उद्देशाने शासनाच्या २५ लाख रुपये निधीतून स्वस्ती प्रदर्शन अकोल्यात भरविण्यात आले. त्याची संपूर्ण माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांनी १७ फेब्रुवारी रोजी पत्रातून मुख्य कार्यकारी अधिकाºयांना मागविली. तसे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी प्रकल्प संचालकांना दिले. त्यावर २४ फेब्रुवारी रोजीच्या दिशा समितीच्या बैठकीनंतर माहिती दिली जाईल, असा पवित्रा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाºयांनी घेतला. त्याचवेळी सहायक प्रशासन अधिकारी डॉ. वाय. बी. वंजारी यांनी २६ फेब्रुवारी रोजी माहिती दिली जाईल, असेही सांगितले होते. त्या दिवशीही माहिती देण्यात आली नाही. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कारणे दाखवा नोटीस देत तत्काळ माहिती देण्याचे बजावले. त्याचाही काहीच फरक न पडल्याने शुक्रवार ९ मार्चपर्यंतही माहिती देण्यात आली नाही. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी पुन्हा नोटीस बजावली. हा प्रकार म्हणजे, स्वस्ती प्रदर्शनातील काही अनियमितता दडपण्यासाठी सुरू असलेली कसरत आहे. तसेच फायलींबाबत अधिकारी-कर्मचाºयांमध्ये एकवाक्यता नसल्याने त्यामध्ये प्रचंड गोंधळ असण्याची शक्यता आहे. लेखा विभागाच्या म्हणण्यानुसार प्रकल्प संचालकांकडे फाइल सादर करण्यात आली, तर प्राप्त माहितीनुसार फाइल लेखा विभागातूनच क्लिअर झाली नसल्याचे समजते. त्यामुळे नेमका घोळ शोधण्याची वेळ आली आहे.