वाहन चालविताना नियम ताेडला, दंड कधी भरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:13 AM2021-07-08T04:13:50+5:302021-07-08T04:13:50+5:30
२०२१ किती जणांनी ताेडला नियम ६० हजार ३१८ एकूण दंडाची रक्कम ९२ लाख किती व्यक्तींनी भरला ...
२०२१ किती जणांनी ताेडला नियम ६० हजार ३१८
एकूण दंडाची रक्कम ९२ लाख
किती व्यक्तींनी भरला दंड ३० हजार ५१८
भरलेला दंड ४१ लाख
किती व्यक्तींनी दंड भरलाच नाही ३० हजार ३००
थकबाकी दंडाची रक्कम ५१ लाख
२०२१ मध्ये झालेली कारवाई
विना हेल्मेट ६१३
विना सीटबेल्ट ८,०५६
अति वेग २,०२१
माेबाइलवर बाेलणे २,५५१
नाे पार्किंग ३७८
ड्रंक अँड ड्राइव्ह ३७
चुकीच्या मार्गाने वाहन चालविणे १६७
वेगावर हवे नियंत्रण
सर्वाधिक दंड माेबाइलचा वापर करणाऱ्यांना
अति वेगात वाहने चालविणे धाेकादायक आहे़ असे वाहनचालक स्वत:सह दुसऱ्यांचाही जीव धाेक्यात घालतात़ सर्वात जास्त कारवाया या अति वेगात वाहन चालविताना माेबाइलचा वापर करणाऱ्यांवर झालेल्या आहेत़ तब्बल दाेन हजार ५५१ वाहनचालकांवर कारवाया करण्यात आलेल्या आहेत़
दंड थकीत ठेवला तर कारवाई निश्चित
दंड आकारल्यानंतर अनेकजण ताे दंड भरत नसल्याचे वास्तव आहे़ मात्र दंड थकीत ठेवला तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून त्या वाहनाचे नूतनीकरण हाेत नाही़ वाहन चालकाचा परवाना देण्यात येत नाही़ तसेच ते वाहन दुसऱ्या काेणत्या शहरात पकडल्या गेले तर आधीचा दंड वसूल झाल्याशिवाय नवीन दंड आकारण्यात येत नाही व पर्यायाने ते वाहन जमा करण्यात येते़ त्यामुळे थकीत दंडाची रक्कम १५ दिवसांच्या आतमध्ये भरणे आवश्यक आहे़