सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने दिली होती ५0 हजारांची सुपारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 01:25 AM2018-02-09T01:25:28+5:302018-02-09T01:30:07+5:30
पातूर : नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना झालेल्या मारहाण प्रकरणाचा छडा लावण्यात पातूर पोलिसांना ८ फेब्रुवारी रोजी यश आले. नगरपालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने मुख्याधिकार्यांना मारहाण करण्यासाठी ५0 हजार रुपयांची सुपारी दिल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. सुपारीच्या रकमेतील २0 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पातूर पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणात मुख्य आरोपीसह पाच आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पातूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना ३१ जानेवारी २0१८ रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी विविध कलमान्वये पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून सागर संजय इंगळे व लखन डागोर यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून सागर रामेकर व गणेश गाडगे यांची नावे समारे आल्याने दोघांनाही पातूर पेालिसांनी गजाआड केले होते. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांना ८ फेब्रुवारी रोजी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढवली आहे. त्यांच्या तपासातून मुख्य आरोपी सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक हाजी सैयद बुरहान सै. नबी असल्याचे तपासात समोर आले आहे. हाजी सैयद बुरहान सै.नबी याने मुख्याधिकारी मिलिंद दारोकार यांना मारहाण करण्यासाठी ५0 हजार रुपये सागर रामेकर आणि गणेश गाडगे यांना देण्याचे कबूल केले होते. हाजी सैयद बुरहान सै.नबी याच्या अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळील सॉ मिल कार्यालयात ठरलेल्या रकमेतील अर्धी रक्कम २५ हजार रुपये दोघांना देण्यात आली होती. पोलिसांनी दोघांनाही ८ फेब्रुवारी रोजी घटनास्थळावर नेऊन पंचनामा केला. तसेच त्यांच्याकडून २0 हजार रुपये जप्त केले. आरोपींनी दिलेला कबुलीजबाब, फिर्यादीने दिलेली नावे, आरोपींचे मोबाइल लोकेशन व घटनास्थळावर पोलिसांनी जाऊन केलेला पंचनामा, यावरून पातूर पोलिसांनी मुख्य आरोपीचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. मुख्य आरोपी हाजी सैयद बुरहान सै. नबी हा पसार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.