साचलेल्या पाण्याचा विसर्ग; पोपटखेड धरण फुटल्याची परिसरातील गावांमध्ये अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 07:18 PM2018-01-19T19:18:56+5:302018-01-19T19:21:44+5:30

पोपटखेड : पोपटखेड धरणाच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये साचलेल्या पाण्याचा विसर्ग १८ जानेवारी रोजी दुपारपासून करण्यात आला. साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील नाल्यांनी गावांमध्ये अचानक पोहोचल्याने धरण फुटल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये पसरली होती.

Rumor in villages about popatkhed dam | साचलेल्या पाण्याचा विसर्ग; पोपटखेड धरण फुटल्याची परिसरातील गावांमध्ये अफवा

साचलेल्या पाण्याचा विसर्ग; पोपटखेड धरण फुटल्याची परिसरातील गावांमध्ये अफवा

Next
ठळक मुद्देसाचलेले पाणी परिसरातील नाल्यांनी गावांमध्ये अचानक पोहोचल्याने धरण फुटल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये पसरली होती.धरण परिसरात राजुरा, अंबाडी, अकोली जहागीर आदी गावांतील नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते.या पाण्यामुळे अकोली जहागीर येथील गोपाल बोराडे यांची दुचाकी, तर अंबाडी येथील शंकर जायले यांची गाय वाहून गेली.

पोपटखेड : पोपटखेड धरणाच्या टप्पा क्रमांक दोनमध्ये साचलेल्या पाण्याचा विसर्ग १८ जानेवारी रोजी दुपारपासून करण्यात आला. साचलेले पाणी मोठ्या प्रमाणात परिसरातील नाल्यांनी गावांमध्ये अचानक पोहोचल्याने धरण फुटल्याची अफवा ग्रामस्थांमध्ये पसरली होती. नाल्यांना आलेल्या पाण्यात एक दुचाकी आणि गाय वाहून गेली. अचानक नदी, नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे ग्रामस्थांची एकच तारांबळ उडाली.
पोपटखेड धरणाचे टप्पा क्र. दोनचे काम सध्या सुरू आहे. काम सुरू असलेल्या धरण क्षेत्रात पावसाचे शेकडो लीटर पाणी साचले होते. याच भागात धरणाच्या वाढीव भिंतीचे काम सुरू असून, या कामावर दररोज ट्रकद्वारे काळ्या मातीची वाहतूक केल्या जाते. नवीन भिंतीवर हे ट्रक जाण्यासाठी रॅम्प बनविण्यात आला होता. या रॅम्पमुळे पावसाचे पाणी अडवल्या गेले होते. संरक्षण भिंतीचे पुढचे काम करण्यासाठी हे रॅम्प १८ जानेवारी रोजी काढण्यात आले. त्यामुळे साचलेले पावसाचे पाणी नदी, नाल्यांनी धरण परिसरातील गावात पोहोचले. अचानक मोठ्या प्रमाणात पाणी गावात पोहोचल्याने ग्रामस्थांमध्ये पोपटखेड धरण फुटल्याची अफवा पसरली. धरण परिसरात राजुरा, अंबाडी, अकोली जहागीर आदी गावांतील नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. या पाण्यामुळे अकोली जहागीर येथील गोपाल बोराडे यांची दुचाकी वाहून गेली तर अंबाडी येथील शंकर जायले यांची गाय वाहून गेल्याने जखमी झाली. पोपटखेड धरणात सध्या ३० ते ३५ टक्के जलसाठा आहे. (वार्ताहर)

Web Title: Rumor in villages about popatkhed dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.