सहायक बीडीओची जामिनासाठी धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:03 AM2017-09-04T02:03:02+5:302017-09-04T02:03:11+5:30
अकोला : शौचालय बांधकामाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी लाच मागणार्या सहायक बीडीओ सुधाकर पंडे याने अटकपूर्व जामिनासाठी धावपळ सुरू केली आहे.
या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वीच बीडीओंसह सहा जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली होती.
पंतप्रधान ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत हगणदरीमुक्त गाव योजनेंतर्गत निंभोरा ग्रामपंचायत क्षेत्रात शौचालये बांधण्यात आली होती. निंभोरा येथील सरपंच पुष्पा सुभाषराव ताथोड यांचा मुलगा नितीन याने हिंगणा तामसवाडी येथील शौचालयाचे देयक काढण्यासाठी १४ हजार ९00 रुपयांची मागणी केली होती.
यावरून चार जणांना अटक केली. मात्र, सहायक बीडीओ पंडे अद्यापही फरार असून, त्याने अटकपूर्व जामीनासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत.