जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तेल्हारा तालुक्यातून रूपाली खारोडे मताधिक्क्याने विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:29 AM2021-02-23T04:29:00+5:302021-02-23T04:29:00+5:30
तेल्हारा : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तेल्हारा तालुक्यात शेतकरी पॅनलच्या रूपाली संदीप खारोडे यांचा विजय झाला ...
तेल्हारा : अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत तेल्हारा तालुक्यात शेतकरी पॅनलच्या रूपाली संदीप खारोडे यांचा विजय झाला असून, त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शेतकरी सहकार पॅनलचे नारायण मोहोड यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. खारोडे यांना २४ तर मोहोड यांना ११ मते मिळाली. त्यामुळे सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा शेतकरी पॅनलने आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसून आले आहे.
तेल्हारा तालुक्यातील सहकार क्षेत्रात काही दिवसांपासून तालुक्यातील दोन सहकार गट सक्रिय झाल्याचे दिसून आले होते. यामध्ये शेतकरी पॅनलमध्ये फूट आणि शेतकरी सहकार पॅनलची युती त्यामुळे शेतकरी पॅनल हे निश्चित कुणाचे याबद्दल अनेक चर्चा झाल्या होत्या. या सर्व घडामोडी झाल्यानंतर पहिली निवडणूक अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ठरली. यात शेतकरी पॅनलचे संदीप रमेशराव खारोडे यांच्या नेतृत्वात रूपाली खारोडे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये पुन्हा उमेदवारी जाहीर केली. निवडणुकीत त्यांनी शेतकरी सहकार पॅनलचे नारायणराव मोहोड यांचा मोठ्या फरकाने पराभव करून पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्या विराजमान झाल्या. या निवडणुकीदरम्यान शेवटच्या तीन-चार दिवसांमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. या घडामोडींमधून कोण विजयी होणार, याबाबत अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. रूपाली खारोडे यांचा विजय होताच त्यांच्या समर्थकांनी अकोला व तेल्हारा येथे आनंदाेत्सव साजरा केला.