कांदाविक्रीची घाई; मात्र योग्य दर मिळत नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:15 AM2021-05-29T04:15:50+5:302021-05-29T04:15:50+5:30

तीन महिन्यांआधी होते ३५०० ते ४५०० रुपये क्विंटल दर बाजारात कांदा आवक घटल्याने कांद्याला ३५००-४५०० प्रति क्विंटल दर मिळत ...

Rush to sell onions; But not getting the right rate! | कांदाविक्रीची घाई; मात्र योग्य दर मिळत नाही !

कांदाविक्रीची घाई; मात्र योग्य दर मिळत नाही !

Next

तीन महिन्यांआधी होते ३५०० ते ४५०० रुपये क्विंटल दर

बाजारात कांदा आवक घटल्याने कांद्याला ३५००-४५०० प्रति क्विंटल दर मिळत होता; मात्र तीन महिन्यापासून कांद्याचे दर सतत घसरत आहे. कांद्याला बाजार समितीत १२०० ते १४०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

शुक्रवारी ५५० क्विंटल आवक

बाजार समितीत कांदा आवक सुरू आहे. दर मिळत नसल्याने कमी प्रमाणात माल विक्रीस येत आहे. शुक्रवारी बाजार समितीत ५५० क्विंटल कांद्याची आवक होती.

आठवडी बाजार बंदचा फटका

यंदा जिल्ह्यात ५९६ हेक्टर क्षेत्रात उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली होती. आठवडी बाजार बंद असल्याने कांद्याची मागणी कमी आहे. कांद्याची विक्री करण्यास शेतकरी घाई करत आहे; पण व्यापारी घेण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

शेतकऱ्यांकडून कांदा येणे सुरू आहे. आठवडी बाजार बंद असल्याने मागणी कमी आहे. निर्बंध हटल्यास विक्री वाढू शकते. काही दिवसांनी कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

- विशाल बालचंदानी, अडत दुकानदार

Web Title: Rush to sell onions; But not getting the right rate!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.