गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांची हकालपटटी करा; अन्यथा १५ दिवसात भूमिका जाहीर करू! - खासदार संजय धोत्रे यांचा मुख्यमंत्र्यांना 'अल्टीमेटम'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 05:10 PM2018-03-01T17:10:28+5:302018-03-01T17:16:14+5:30

अकोला : राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा 15 दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशारा भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांनी गुरुवारी दिला.

Sack Minister of State Ranjit Patil - Sanjay Dhotre's 'ultimatum' | गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांची हकालपटटी करा; अन्यथा १५ दिवसात भूमिका जाहीर करू! - खासदार संजय धोत्रे यांचा मुख्यमंत्र्यांना 'अल्टीमेटम'

गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांची हकालपटटी करा; अन्यथा १५ दिवसात भूमिका जाहीर करू! - खासदार संजय धोत्रे यांचा मुख्यमंत्र्यांना 'अल्टीमेटम'

Next
ठळक मुद्देडॉ. रणजित पाटील यांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी येथील ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान उफाळलेल्या वादातून, डॉ. पाटील यांच्या निकटवतीर्यांनी विरोधी गटातील लोकांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केल्याचा व एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे.याचा जाब विचारण्यासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची भेट घेतली.डॉ.पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपटटी करावी; अन्यथा पंधरा दिवसानंतर आपण व आपले सहकारी भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशाराच त्यांनी दिला.

अकोला : राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी; अन्यथा 15 दिवसांनंतर आपण आपली भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशारा भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय धोत्रे यांनी गुरुवारी दिला.
डॉ. रणजित पाटील यांचे मूळ गाव असलेल्या घुंगशी येथील ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान उफाळलेल्या वादातून, डॉ. पाटील यांच्या निकटवतीर्यांनी विरोधी गटातील लोकांच्या घरात शिरून त्यांना मारहाण केल्याचा व एका महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करूनही पोलिसांनी गुन्हे का दाखल केले नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा व आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात, भाजपाच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांची भेट घेतली. त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, खा. धोत्रे यांनी डॉ. रणजित पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली.
खा. धोत्रे व डॉ. पाटील यांच्यातील बेबनाव नवा नाही. दोन्ही गट सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असतात. डॉ पाटील यांच्या घुंगशी या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीवरून या दोन गटांमधील वाद नव्याने उफाळला आहे. निवडणुकीदरम्यान डॉ. पाटील यांच्या गटातील लोकांनी विरोधी गटातील हिंमतराव देशमुख यांच्यावर हल्ला करून, त्यांचे बोटच दातांनी तोडून टाकण्याचा प्रकार घडला आहे. याशिवाय इतरही काही जणांना मारहाण व एका महिलेचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती; मात्र पोलिसांनी अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत.
या पार्श्वभूमीवर खा. धोत्रे यांनी गृह राज्यमंत्र्याना लक्ष्य करून, त्यांच्यावर अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला. शासकीय यंत्रणेला वेठीस धरून मनमानी करणा?्या डॉ.पाटील यांची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रीमंडळातून हकालपटटी करावी; अन्यथा पंधरा दिवसानंतर आपण व आपले सहकारी भूमिका जाहीर करू, असा निवार्णीचा इशाराच त्यांनी दिला.
मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसह, जिल्ह्यातील इतर तीन ग्राम पंचायतींच्या पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. घुंगशी या गावात देशमुख व पाटील गटात अनेक वषार्पासून वाद सुरू आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तो पुन्हा रंगला होता. निवडणूक निकालाने डॉ. पाटील यांच्या गटाला मोठा धक्का बसला. त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. डॉ. पाटील यांच्या गटाच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत.


घुंगशी ग्रामपंचायत निवडणुकीचा आणि त्या निवडणुकीत उद्भवलेल्या वादाशी माझा कुठलाही संबंध नाही. गत वर्षभरात मी त्या गावातही गेलेलो नाही. मी त्या गावाचा मतदारही नाही. त्यामुळे तेथे घडलेल्या प्रकरणाशी माझा संबंध जोडणे चुकीचे आहे. माझ्यावर करण्यात आलेले आरोप सपशेल खोटे आहेत. यापूर्वी अनेकदा ज्या गोष्टींचा माझ्याशी काहीही संबध नाही. त्याच्याशी संबंध जोडून माझ्यावर आरोप झालेत. त्यातलाच हा प्रकार आहे.पुरावे न देता  केवळ व्यक्तीगत द्वेषातून  असे आरोप करणे चुकीचे आहे. घुंगशी येथे झालेला प्रकार निंदनीय आहे.या बाबत कारवाई झालीच पाहिजे. कायद्यनुसार ती होईलच; मात्र केवळ मला अडचणीत आणण्यासाठी खोटे आरोप केले जात आहेत.
- डॉ. रणजीत पाटील, गृहराज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य.

Web Title: Sack Minister of State Ranjit Patil - Sanjay Dhotre's 'ultimatum'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.