कुटासा येथील विवाहितेचा हुंडाबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:19 AM2021-01-20T04:19:18+5:302021-01-20T04:19:18+5:30
अकाेला : दहीहांडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कुटासा येथील रहिवासी एका महिलेला सासरच्यांनी प्रचंड छळ करीत पैशाची मागणी केली. तसेच ...
अकाेला : दहीहांडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील कुटासा येथील रहिवासी एका महिलेला सासरच्यांनी प्रचंड छळ करीत पैशाची मागणी केली. तसेच मारहाण केल्याने हा त्रास असह्य झाल्यानंतर विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ९ जानेवारी राेजी घडली. या प्रकरणी दहीहांडा पाेलिसांनी हुंडाबळीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आकाेट तालुक्यातील रहिवासी गणेश रामभाऊ बाेराेकार यांची मुलगी मेघा बाेराेकार हिचा विवाह कुटासा येथील रहिवासी शुभम शंकर शित्रे याच्यासाेबत ३ जुलै २०१८ राेजी झाला हाेता. यावेळी मेघाच्या वडिलांनी सासरच्यांना तीन लाख रुपयांचा हुंडा दिला हाेता. मात्र विवाहानंतरही सासरच्या मंडळीने तिचा पैशासाठी छळ सुरू केला हाेता. मेघाचा पती शुभम शित्रे, सासरा शंकर शित्रे व सासू संगीता शित्रे या तिघांनी छळ सुरूच ठेवला. हा छळ असह्य झाल्यानंतर मेघाने ५ जानेवारी राेजी पहाटे विष प्राशन केले. यावेळी तिला सासरच्यांनी पट्ट्याने मारहाणही केली हाेती. या प्रकाराची माहिती मेघाचे वडील गणेश बाेराेकार यांना मिळताच त्यांनी कुटासा येथे धाव घेतली व मेघाला तातडीने अकाेला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, या दरम्यान ९ जानेवारी राेजी तिचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी दहीहांडा पाेलिसांनी गणेश बाेराेकार यांच्या तक्रारीवरून शुभम शित्रे, सासरा शंकर शित्रे व सासू संगीता शित्रे या तिघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०४ अ, ४९८ ब, ३२३, ३२४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास दहीहांडा पाेलीस स्टेशनचे ठाणेदार महेश गावंडे करीत आहेत.