तेल्हारा तालुक्यातील सदरपूर येथे भीषण पाणीटंचाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 08:45 PM2017-11-27T20:45:59+5:302017-11-27T20:58:38+5:30
तेल्हारा तालुक्यातील चितलवाडी गटग्रामपंचायतमधील सदरपूर येथील पाणी पुरवठा काही महिन्यांपासून बंद आहे. पाणी पुरवठा सुरू करण्याकरिता येथील नागरिकांनी ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तालुक्यातील चितलवाडी गट ग्रामपंचायतमधील सदरपूर येथील पाणी पुरवठा काही महिन्यांपासून बंद आहे. पाणी पुरवठा सुरू करण्याकरिता येथील नागरिकांनी ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तेल्हारा तालुक्यातील सदरपूर येथील प्रकाश सुरेश मेतकर व मीरा भास्कर मे तकर या शेतमजुरांनी गावातील पाणी पुरवठा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असल्याबाबत लेखी अर्जाद्वारे संबंधित विभागास कळविले होते; परंतु दिलेल्या तक्रारीकडे संबंधित विभागाने लक्ष न दिल्यामुळे अखेर ५ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला. हे उपोषण पाणी पुरवठा सुरळीत होईपर्यंत राहील व या दरम्यान कोणतीही हानी झाल्यास शासन जबाबदार राहील, असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनाच्या प्रति संबंधित विभागास दिल्या आहेत.