संत नरहरी महाराज राज्यस्तरीय जयंती सोहळा थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 04:19 PM2019-08-13T16:19:06+5:302019-08-13T16:20:09+5:30

संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा राज्यस्तरीय जयंती सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

Saint Narhari Maharaj birth anniversary celebrations | संत नरहरी महाराज राज्यस्तरीय जयंती सोहळा थाटात

संत नरहरी महाराज राज्यस्तरीय जयंती सोहळा थाटात

googlenewsNext

अकोला: सोनार समाज सेवा मंडळाच्या राज्य शाखेच्या वतीने येथील डाबकी मार्गावरील नंदोन मंगल कार्यालयात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा राज्यस्तरीय जयंती सोहळा मोठ्या थाटात पार पडला. शाखा भेद विसरून एकत्र होवून समाजाचा विकास साधावा, समाज एकत्रीकरण ही काळाची गरज आहे,असे आवाहन हरिदास रत्नपारखी यांनी अध्यक्षीय भाषणात केले.
सोनार समाज सेवा मंडळाचे राज्य अध्यक्ष सुनिल डांगे यांनी संघटनेच्या कार्याचाआढावा सांगून समाज बांधवांनी या कायार्साठी पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली. अ‍ॅड. प्रविण सोनी यांनी समाज संघटन आवश्यक असून एकोप्यामुळे समाजातील प्रत्येकाच्या प्रगती चा मार्ग सुकर होतो असे मार्गदर्शनपर केले. हेमंत रत्नपारखी यांनी समाज कार्यात युवकांच्या पुढाकार महत्वाचे असून युवकांनी सदैव समाज कार्यात तत्पर राहावे असे आवाहन केले. यावेळी गोपाळराव लोणकर उमरी, उत्सव समिती अध्यक्ष श्रीकृष्ण धरमकर,गजानन आवारे,यांची प्रमुख उपस्थिती होती. संचालन शितल करे व श्रध्दा दसोरे यांनी केले. आभार सेवा मंडळाचा राज्य कार्याध्यक्ष अमोल बुट्टे यांनी मानले. महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
गावोगावीच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार
अकोला, बुलडाणा, वाशिम,अमरावती, पुणे, जिल्ह्यातील तालुका व जिल्हा शाखेच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सेवा मंडळाच्या पदाधिकायार्चा यावेळी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी सकाळी अकोला शहरातून संत शिरोमणी नरहरी महाराज प्रतिमेची टाळमृदंगाचे निनादात शोभा यात्रा काढण्यात आली.

 

Web Title: Saint Narhari Maharaj birth anniversary celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.