पावसासाठी वरुणराजाला साकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:14 AM2021-06-25T04:14:56+5:302021-06-25T04:14:56+5:30
गतवर्षी नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यंदा भरपूर पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे शेतकरी सुखावला होता. यंदा तरी चांगले ...
गतवर्षी नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. यंदा भरपूर पावसाचा अंदाज वर्तविला असल्यामुळे शेतकरी सुखावला होता. यंदा तरी चांगले पीक होईल. या आशेने शेतकऱ्यांनी आर्थिक तडजोड करून कर्ज काढून बी-बियाण्यांसह खतांची तरतूद केली. सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे या भागातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु, आता पावसाने अचानक दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने आपल्या शेतीत पेरणी केली. आता शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसासाठी वरुणराजाला शेतकरी साकडे घालत आहे. शेतकऱ्यांचे आभाळाकडे डोळे लागले आहेत. परंतु, पाऊस येत नसल्याने, पेरणी केलेल्या पिकांचे कसे होणार? दुबार पेरणीची वेळ येणार नाही? अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. पाऊस आला नाही? तर दुबारपेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
फोटो :
दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवर संकट
शेतातील पिके अंकुरली असतानाच, गत काही दिवसांपासून वरुणराजाने दांडी मारल्याने पिके शेवटची घटका मोजत आहेत. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. दरम्यान, अकोला तालुक्यात अल्प प्रमाणात बहुतांश पेरणी झाली असून, पिकांना जीवदान मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी पाऊस पडावा म्हणून वरुणराजाला साकडे घातले आहेत. पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत.