स्कॉलरशिपची रक्कम हडपणाºया शाळांची चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 01:52 PM2017-07-29T13:52:32+5:302017-07-29T13:52:32+5:30
अकोला: शहरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप हडपल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्याने अकोल्यातील जनसत्याग्रह संघटनेने आंदोलन छेडण्याचा इशारा देत स्कॉलरशिपची रक्कम हडपणाºया शाळांची चौकशी करावी, अशा आशयाचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले.
जन सत्याग्रह चर्चा करून निवेदन देताना कारवाईची मागणी केली. अकोला शहर व जिल्ह्याच्या कोणत्याही शाळांच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपमधून पैसे घेतल्या गेल्यास त्या शाळेची मान्यता रद्द करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. अकोला शहरामध्ये मनपा जि.प. सोबत अनेक खासगी संस्थेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. या शाळेत गरिबांची मुले मोठ्या प्रमाणात आहेत. शासनाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिलेल्या शिष्यवृत्तीतून काही शाळेतील शिक्षकवृंदांनी स्कॉलरशिपमधून २०० आणि ५०० रुपये घेण्याचे प्रयोग सुरू केले आहे. विचारणा केली असता, पालकांना बिल्डिंग फंड आणि इतर अनुदानासाठी भेट घेतल्याचे सांगतिले जाते. दरवर्षी बिल्डिंग फंंडच्या नावाने लुटणाºया अशा शाळांची चौकशी करून त्यांची मान्यता रद्द करा आणि तिथे क्षिकणाºया मुला-मुलींचे प्रवेश दुसºया शाळेत ट्रान्सफर करा, असेही निवेदनातून म्हटले आहे. सदर निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष आसिफ अहमद खान यांच्या नेतृत्वात देण्यात आले. याप्रसंगी एजाज अहमद कुरेशी, मो. जावेद रंगूनवाला, अमित खांडेकर, जावेद ठेकेदार, मो. अशफाक, इमरान मिर्जा, मसूद खान, शारीक खान, शाहीद खान, इमरान खान, मो. बिस्मिल्लाह, शेख नाजीम, तौसीफ अहमद मोंटू, मो. अनवर आदी उपस्थित होते.