निराधारांचे पगार थांबले; वृद्धांच्या बॅंकेत चकरा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:35+5:302021-09-25T04:18:35+5:30
बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा परिसरातील वृद्धांचे जुलै, ऑगस्ट दोन महिन्यांचे पगार रखडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच ...
बार्शीटाकळी तालुक्यातील निहिदा परिसरातील वृद्धांचे जुलै, ऑगस्ट दोन महिन्यांचे पगार रखडले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे. वृद्धांचे पगार थांबल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पगाराची रक्कम खात्यात जमा झाली किंवा नाही ते पाहण्यासाठी वृद्धांची बॅंकेत गर्दी वाढली आहे. दररोज वृद्धांच्या चकरा वाढल्या असून, भाड्याचा खर्चाने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन वृद्धांचे पगार त्वरित करण्याची मागणी होत आहे.
------------------------------
वृद्धांच्या खात्यात त्वरित जमा होणार रक्कम
बार्शीटाकळी येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार विभागामध्ये सर्व कर्मचारी, अधिकारी नवीन असल्याने थोडा विलंब झाला. येत्या दोन दिवसांत वृद्धांना एक महिन्याचा आधी व त्यानंतर दुसऱ्या महिन्यांचा पगाराची रक्कम खात्यात टाकण्यात येईल, अशी मागणी तहसीलदार गजानन हामंद यांनी दिली आहे.
तसेच तहसील कार्यालयाकडून रक्कम मिळाली नसून, रक्कम प्राप्त होताच तत्काळ वितरित केल्या जाईल, अशी माहिती पिंजर येथील जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक अजय धोत्रे यांनी दिली.