माना येथे बोगस खतांची विक्री; आरोपीस अटक

By admin | Published: June 12, 2016 02:44 AM2016-06-12T02:44:03+5:302016-06-12T02:44:03+5:30

अकोला जिल्ह्यात बोगस बियाण्यांची विक्री जोरात

Sale of bogus fertilizers here; The accused arrested | माना येथे बोगस खतांची विक्री; आरोपीस अटक

माना येथे बोगस खतांची विक्री; आरोपीस अटक

Next

माना (जि. अकोला)- बोगस खतांची विक्री करू न शेतकर्‍यांना फसविणार्‍या तीन आरोपींना मुद्येमालासह पोलिसांनी ११ जून रोजी अटक केली आहे. या परिसरात बोगस कंपनीचे खते कमी भावात विकल्या जात असल्याची गुप्त माहिती पोलीस व कृषी अधिकार्‍यांना मिळाली होती. कृषी विभागाच्या भरारी पथकाचे मोहीम अधिकारी अरुण गावंडे, गुण नियंत्रण निरीक्षक मिलिंद जंजाळ व कृषी अधिकारी सुरेश तिजारे यांनी पाळत ठेवून सापळा रचला व नीलेश मालठाणे याच्या घरासमोर शेतकर्‍यांना खत विक्री करताना दलालांना रंगेहात पकडले. या आरोपींकडून राघवेंद्र फर्ल्टिलायझर उत्पादित सेंद्रित खत या नावाचे पोटॅशयुक्त खत जप्त केले. या खताच्या बॅगवर विक्रीसाठी आवश्यक असलेल्या बाबीची नोंद नाही. शेतकर्‍यांना गावागावांत जाऊन या खताची विक्री करणारी ही टोळी पोलिसांच्या व कृषी अधिकार्‍याच्या हाती लागली आहे. या विक्रेत्यांकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र नसल्यामुळे संशय बळावला आहे. इंडो फर्ल्टिलायझर कार्पोरेशन हे या खताचे विक्रेता असल्याचेही समजते. याप्रकरणी माना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला व सुरज अशोक चौधरी रा. वर्‍हा, प्रकाश सुरेश तायडे रा. येवदा, रोशन रमेश मालोदे व शाहीद मदारी हुसेन यांना अटक केली आहे. बोगस खतासोबतच जिल्ह्यात बिटी कापसाच्या वेगवेगळ्या बोगस वाणांची विक्री सुरु असल्याची माहिती आहे.

Web Title: Sale of bogus fertilizers here; The accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.