किराणा दुकानातून गांजाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:13 AM2021-07-03T04:13:09+5:302021-07-03T04:13:09+5:30
अकोला : मोठी उमरी परिसरात असलेल्या महाकाली नगरातील एका किराणा दुकानातून प्रतिबंधित गांजाची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस ...
अकोला : मोठी उमरी परिसरात असलेल्या महाकाली नगरातील एका किराणा दुकानातून प्रतिबंधित गांजाची विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने गुरुवारी रात्री छापा टाकला. या किराणा दुकानातून ७११ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
महाकाली नगर येथील रहिवासी रवींद्र महादेव सोनटक्के (२९) हा त्याच्या किराणा दुकानातून प्रतिबंधित असलेल्या गांजाची अवैधरित्या विक्री करीत असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाला मिळाली. या माहितीवरून त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून ७११ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पीएसआय ब्राह्मणे, महेंद्र बहादुरकर, जितेंद्र हरणे, विनय जाधव, राज चंदेल यांनी केली.